मुंबई- शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण हे नवे गाणे रिलीज झाले आहे. बेशरम रंग गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर शाहरुख खानने पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण हे गाणे लॉन्च केले. या गाण्यातही दीपिका आणि शाहरुखची जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून या गाण्याची प्रतीक्षा शाहरुखचे चाहते करत होते.
जबरदस्त लोकेशन्स, रंगबिरंगी बॅकग्राऊंड डान्सर्सचा समुदाय आणि शाहरुख आणि दीपिकाच्या तालबद्ध मुव्हमेंट्स यांनी गाण्यात धमाल केली आहे. प्रत्येकाला थिरकण्याची इच्छा होईल असे हे गाणे झाले आहे. या गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को सिझर या मास्टरची आहे. गीतकार कुमारने लिहिलेल्या या गाण्याला विशाल आणि शेखरच्या संगीताला अरजित सिंग, सुक्रिती कक्कर, विशाल आणि शेखर यांनी स्वरसाज चढवला आहे.
शाहरुख खानने गाणे रिलीज झाल्याची घोषणा आपल्या इन्स्टाग्रामवर केली आहे. त्याने लिहिलंय, ''तुमने मोहब्बत करनी है, हमने मोहब्बत की है, इस दिल के अलावा किसी से भी, ना हमने इज्जत ली है!! आता झुमलो, झुमे जो पठाण गाणे आऊट,'' असे त्याने गाण्याला कॅप्शन दिले आहे.
गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. रिलीज नंतर केवळ अर्धा तासात युड्यूबवर हे गाणे ११ लाख लोकांनी पाहिले आहे. या गाण्यावर हजोरो कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये शाहरुखच्या कबॅकचे व दीपिकासोबतच्या ऑन स्क्रिन केमेस्ट्रीचे स्वागत प्रेक्षक करत आहेत.