मुंबई : शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या यशाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने 9 दिवसांत 700 कोटींची कमाई केली. हा चित्रपट अजूनही भारतीय आणि जगभरातील बॉक्स ऑफिसवर राज्य करीत आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खान आपल्या यशाने जगभरात वाहवा मिळवत आहे. शाहरुख खानबद्दल ब्राझीलच्या एका लेखकाने त्याचे वर्णन 'किंग अँड लिजेंड' असे केले होते. आता 'पठाण'चे प्रचंड यश पाहून एका अमेरिकन पत्रकाराने ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पत्रकाराने शाहरुख खानची तुलना हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझसोबत केली आहे, ज्यावर शाहरुख खानचे चाहते चिडले आहेत.
ट्विटमध्ये अमेरिकन पत्रकाराने काय लिहिले, पाहा :शाहरुख खानच्या पठाणला मिळालेले यश पाहून अमेरिकन पत्रकार स्कॉट मेंडेलसन यांनी ३ फेब्रुवारी रोजी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'शाहरुख खान हा भारताचा टॉम क्रूझ आहे. ज्याने आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपट पठाणने बॉलिवूडला जिवंत केले आहे.
शाहरुख खानचे चाहते संतापले :आता या अमेरिकन पत्रकाराच्या या ट्विटवर शाहरुख खानचे चाहते भडकले आहेत आणि त्याचे ट्विट रिट्विट करून आपला आक्षेप नोंदवत आहेत. शाहरुख खानच्या एका चाहत्याने लिहिले आहे की, 'तो भारताचा टॉम क्रूझ नाही, तो फक्त आणि फक्त शाहरुख खान आहे'. किंग खानचा आणखी एक चाहता लिहितो, 'अनादर'.
शाहरुखच्या चाहत्यांची अमेरिकन पत्रकाराला तिखट उत्तरे :शाहरुख खानच्या आणखी एका चाहत्याने लिहिले, 'एसआरके राजा आहे, अॅक्शन, रोमान्स, ड्रामा, स्टाइल, वृत्तीने बहुआयामी महान अभिनेता आहे, कोणीही त्याच्या जवळ नाही. त्याची तुलना इतर कोणाशीही करू नका'. एका चाहत्याने खूप पुढे जाऊन लिहिले, 'टॉम क्रूझ हा हॉलिवूडचा शाहरुख खान आहे, तुम्हाला याबद्दल काय वाटते'. त्या पत्रकाराच्या ट्विट शाहरुखच्या चाहत्यांनी तिखट उत्तरे दिली आहेत.
पाहा 'पठाण'चे आतापर्यंतचे कलेक्शन : शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी ५५ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नऊ दिवस पूर्ण केले. भारतीय बॉक्स ऑफिसवर 351 कोटी रुपये आणि जगभरात 700 कोटी रुपयांची कमाई केली. हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये जोरात चालू आहे.