मुंबई - Dhoom 4: शाहरुख खानसाठी 2023 हे वर्ष खूप हिट ठरले आहे. चालू वर्षात शाहरुख खाननं 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 2023च्या आधीचा काळ हा 'किंग खान'साठी खूप कठीण होता. त्याचा 'फॅन', 'झीरो' आणि 'जब हॅरी मेट सेजल' हे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यानं 4 वर्षासाठी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. 2024 वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरले आहेत. 2024 मधील मेगा बजेट चित्रपट 'धूम 4' या अॅक्शन चित्रपटामध्ये शाहरुख हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2023 मध्ये शाहरुख पहिल्यांदा 'पठाण' हा अॅक्शन चित्रपट केला होता. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
शाहरुख खान धूम ४ मध्ये? : शाहरुख खान, जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खानसोबत 'धूम 4' मध्ये अॅक्शन करताना दिसणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये होत आहे. 'डॉन 3'च्या अपयशानंतर चाहते आता 'धूम 4' मध्ये शाहरुख खानची वाट पाहत आहेत. 'धूम 4'ची चर्चा खूप दिवसांपासून होत असली तरी यशराज बॅनरने अद्याप या अॅक्शन फ्रँचायझीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा 'धूम 4'मध्ये शाहरुख खानच्या उपस्थितीची पुष्टीही केलेली नाही. 'धूम 4' चे नावच ऐकायला मिळत आहे, मात्र अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही चित्रपटाचा अद्याप पत्ता नाही.