मुंबई :बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आनंदाला थारा नाही. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-20 सामन्यात रविवारी शाहरुखचा संघ कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना जिंकला. केकेआरच्या रिंकू सिंगने सलग 5 षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या या षटकाराने किंग खानसह अनेक बॉलिवूड स्टार आश्चर्यचकित झाले.
शाहरुखने ट्विटरवर केली पोस्ट : अभिनेता आणि क्रिकेट संघ कोलकाता नाइट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने रविवारी KKR च्या IPL थ्रिलरच्या अंतिम षटकात सलग 5 षटकार मारल्याबद्दल क्रिकेटपटू रिंकू सिंगचे कौतुक केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध 2023 चा सामना अतिशय रोमांचक होता. शाहरुखने ट्विटरवर त्याच्या 'पठाण' चित्रपटाचे रिंकूच्या चेहऱ्याचे मॉर्फ केलेले पोस्टर शेअर केले आणि लिहिले, झूम जो रिंकू.... रिंकू माय बेबी. अभिनंदन. यासोबतच शाहरुख खानने पुढे लिहिले की, वेंकी मैसूर आपल्या हृदयाची काळजी घ्या!
असा झाला सामना : शाहरुखचा मुलगा आर्यन खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रिंकू सिंगचा एक फोटो शेअर केला आणि त्याला बीस्ट असे कॅप्शन दिले. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 20 षटकांत 4 बाद 204 धावा केल्या. विजय शंकरने 24 चेंडूत चार चौकार आणि पाच षटकारांने सर्वाधिक 63 धावा केल्या. साई सुदर्शनने आयपीएल 2023 मध्ये आपले दुसरे अर्धशतकही झळकावले. त्याने 38 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांने 53 धावा केल्या.
रिंकू सिंगचे कौतुक : यासोबतच शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी सेक्शनवर क्रिकेटर रिंकू सिंगचा मैदानातील एक फोटो शेअर केला आणि अवास्तव असे कॅप्शनमध्ये लिहिले. ते काहीही असो, रिंकू सिंगने आपल्या जादुई षटकाराने किंग खान तसेच त्याच्या कुटुंबियांची मने जिंकली आहेत. सुहाना खान, आर्यननेही फोटोसह पोस्ट शेअर करून रिंकू सिंगचे कौतुक केले आहे.
हेही वाचा :Jaya Bachchan Birthday : अभिषेक बच्चनने आई जया बच्चन यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा