मुंबई : Shahrukh Khan Funny Reply : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. या चित्रपटानम तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 200 कोटीहून अधिक व्यवसाय केला. सोशल मीडियावर सध्या फक्त 'जवान' चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटामधील चाहत्यांना गाणं देखील आवडत आहे. किंग खानचं 'जवान'साठी सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. या चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. 'जवान'मधील शाहरुख खानचं लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला असून अनेकजण आता त्याच्यासारखा लूक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
चाहत्यांना प्रश्न 'गर्ल गँग' : दुसरीकडे, शाहरुख सध्या 'जवान'ला मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल चाहत्यांचं आभार मानण्यासाठी वेळ काढत आहे. सोशल मीडियावर एका चाहत्यानं शाहरुख खानला 'जवान'बाबत एक प्रश्न विचारला. त्यानं म्हटलं, 'जवान' चित्रपटात इतक्या मुली का? आहे. त्यानंतर किंग खाननं या प्रश्नाचं उत्तर देत त्याला आई आणि मुलींचा आदर करण्याचा सल्ला दिला. शाहरुखनं कमेंटमध्ये लिहलं, हे सगळं का मोजत आहे… माझ लुक पाहा ना!! आपल्या हृदयात प्रेम आणि आदर ठेवा. आई आणि मुलीचा आदर करा… आणि आयुष्यात पुढे जा! असं त्यानं चाहत्याला सांगितलं.