मुंबई : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता 'पठाण' होणार आहे. ‘पठाण’ चित्रपटानंतर शाहरुखला पठाण म्हणून ओळखले जाईल हे नक्की. शाहरुखची प्रसिद्धी जगात इतकी आहे की, त्याचे चाहते त्याच्यासाठी वेडेपणाच्या कोणत्याही थराला जाऊ शकतात. आता हे अलीकडचे उदाहरण घ्या. 'पठाण' रिलीज होण्यासाठी 4 दिवस बाकी आहेत आणि शाहरुख खानच्या जबरा फॅनने संपूर्ण थिएटर बुक केले आहे. कारण या चाहत्याने ज्या थिएटरमध्ये बुकिंग केले आहे, तिथे सकाळी ९ वाजता 'पठाण' चित्रपट सर्वप्रथम प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, शाहरुखच्या या चाहत्याने मुंबईच्या गेटी गॅलेक्सी थिएटरच्या सकाळी ९ वाजताच्या पहिल्या दिवसाच्या-फर्स्ट शोची सर्व तिकिटे बुक केली आहेत.
G7 मल्टिप्लेक्स आणि मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांच्या म्हणण्यानुसार, 'शाहरुख खानच्या एका फॅन क्लबने हे संपूर्ण थिएटर बुक केले आहे हे खरे आहे, अशा परिस्थितीत शाहरुखचे हे जबरा चाहते असतील.
ट्रेड विस्लेशक तरण आदर्श यांनी पठाणच्या आगाऊ तिकीट विक्री बाबतचा तपशील दिला आहे. यामध्ये त्यांनी लिहिलंय की, पठाण चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग स्थितीचे गुरुवार, रात्री 11.30 वाजेपर्यंतचे अपडेट…
⭐️ #PVR: ५१,०००
⭐️ #INOX: ३८,५००
⭐️ #सिनेपोलिस: २७,५००
अशा प्रकारे पठाण चित्रपटाची एकूण १ लाख १७ हजार तिकिटे विकली आहेत. यामुळे बॉक्स ऑफिसवर पठाणने वादळ निर्माण केले आहे. उद्यापासून पूर्ण आगाऊ बुकिंग सुरू होईल, असेही तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पठाण यांच्या नावावर हा विक्रम झाला मुंबईच्या गेटी गॅलेक्सी थिएटरबद्दल एक मोठी गोष्ट सांगायची, तर या थिएटरची स्थापना 1972 साली झाली होती आणि त्यानंतर पहिल्यांदाच येथे सकाळी 9 वाजता चित्रपट प्रदर्शित होत आहे. शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट अशी कामगिरी करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. थिएटरने प्रथमच आपले धोरण बदलले आहे.
पठाणने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केला रेकॉर्ड- शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' अॅडव्हान्स बुकिंगमध्ये प्रचंड कमाई करत आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये 3.68 कोटी रुपयांची कमाई केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगसाठी 1,17,000 तिकिटे विकली गेली आहेत. भारतीय बॉक्स ऑफिसनुसार पठाण चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या शर्यतीत 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. यासोबतच या चित्रपटाने मल्टिप्लेक्स चेनमध्ये 117 हजार तिकिटांची विक्री करून इतिहास रचला आहे.
हेही वाचा -Bafta Awards 2023 : हिंदी डॉक्यूमेंटरी ऑल दॅट ब्रेथ्सला मिळाले नामांकन, आरआरआर शर्यतीतून बाहेर