मुंबई- चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने आपला ५० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. या खास प्रसंगी करण जोहरने त्याच्या खास मित्रांना आणि बॉलिवूड सेलिब्रिटींना एक शानदार पार्टी दिली. तसेच, करणने त्याच्या पार्टीतील पाहुण्याला रेड कार्पेटवर एन्ट्री करून दिली. एकूणच, करण जोहरने त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. या पार्टीत एका व्यक्तीची कमतरता होती, ज्याने नंतर गुप्त प्रवेश घेतला. अर्थात तो होता बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान.
करण जोहरच्या वाढदिवसाच्या दोन दिवसांच्या सेलिब्रेशनमध्ये प्रत्येक स्टारने रेड कार्पेटवरुन एंट्री घेतली, पण शाहरुख खान कुठेच सापडला नाही. अशा परिस्थितीत शाहरुख खानने या पार्टीत सिक्रेट एन्ट्री करीत आणि बर्थडे पार्टीमध्ये जबरदस्त डान्स केला.
शाहरुख खान डीजे फ्लोअरवर डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या पार्टीत शाहरुख काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये पोहोचला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख त्याच्याच चित्रपट 'कुछ कुछ होता है'मधील कोई मिल गया या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे.