मुंबई Dharmendra and Shah Rukh Khan : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबरला रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर आहेत. मोठ्या पडद्यावर तब्बल पाच वर्षानंतर शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन केलंय. आता किंग खान हा 'जवान'द्वारे स्वतःचाच रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. दरम्यान आता 'जवान' रिलीज होण्यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी किंग खानला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धर्मेंद्र यांनी एक्सवरून एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट त्यांनी शाहरुखसाठी लिहिली आहे. चित्रपटासाठी शाहरुखला शुभेच्छा देत त्यांनी लिहिले, 'शाहरुख बेटा, जवानसाठी तुला खूप खूप शुभेच्छा'.
धर्मेंद्र यांनी दिल्या शाहरुख खानला शुभेच्छा :आता या पोस्टवर अनेकजण शाहरुखचे चाहते कमेंट करत धर्मेंद्र यांचं कौतुक करत आहेत. या ट्विटसाठी शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी धर्मेंद्रचे आभार मानले आहेत. शाहरुख खानचे धर्मेंद्रसह इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे या चित्रपटासाठी किंग खानला अनेकजण शुभेच्छा देत आहेत. शाहरुखच्या 'पठाण'ने रुपेरी पडद्यावर खूप कमाई केली होती. 'जवान' चित्रपटाद्वारे शाहरुखने प्रथमच अॅटलीसोबत काम केलं आहे. 'जवान' चित्रपटात नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोवर आणि प्रियामणी हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करू शकतो असं सध्या दिसत आहे. 'जवान' हा रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती आहे.