मुंबई - पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी चित्रपट डंकीच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये दाखल झाला आहे. काश्मीर खोऱ्यातील सुपरस्टार शाहरुखचा व्हडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे. तब्बल ११ वर्षाच्या विश्रांतीनंतर शाहरुख खान काश्मीरमध्ये शुटिंगच्या निमित्ताने आला आहे. काश्मीरमध्ये त्याचो जोरदार स्वागत करण्यात आले.
काश्मीरमध्ये शाहरुखचे जोरदार स्वागत - काश्मीरमधील सुपरस्टार शाहरुखला पाहण्यासाठी त्याचे उत्कट चाहते रोमांचित झाले. त्याचा या स्थळांशी पूर्वीपासून एक खास संबंध आला आहे. शाहरुखला या ठिकाणाची विशेष आठवण आहे कारण तो 11 वर्षांपूर्वी त्याच्या जब तक है जान या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये अखेरचा आला होता. हा चित्रपट दिवंगत दिग्दर्शक यश चोप्राचा शेवटचा चित्रपट होता. त्याच्यानंतर शाहरुखचा हा काश्मीरचा दौरा दशकाहून अधिक काळानंतर आला आहे. काश्मीरातील व्हिडिओंनी त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. शाहरुख खानवर प्रेम दाखवण्याव्यतिरिक्त, त्यांनी राजकुमार हिरानीच्या डंकी या चित्रपटासाठीही आपला उत्साह दाखवून दिला. त्याच्या चाहत्यांनी त्यांचे प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी कमंट सेक्शनला भेट दिली. व्हिडिओंना प्रतिसाद देत, त्याच्या चाहत्यांनी कमेंटमध्ये फायर आणि रेड हार्ट इमोटिकॉन जोडले.