मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' चार वर्षांनंतर अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. शाहरुख खानचे चाहते 2023 वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण 2023 मध्ये शाहरुख खानचे तीन मोठे चित्रपट 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' रिलीज होणार आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या संयमाचा बांध फुटत आहे. दरम्यान, शाहरुख खानने एक व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची अस्वस्थता वाढवली आहे. शाहरुखचा हा व्हिडिओ सौदी अरेबियातून आला असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सह निर्माण झाला आहे.
शाहरुखने वाढवली चाहत्यांची अस्वस्थता - शाहरुख खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचे सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखने 'डंकी' चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे आभार मानले आहेत. शाहरुख व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे, 'डंकी'चे शूटिंग शेड्यूल संपले आहे. व्हिडिओसोबत शाहरुखने कॅप्शन दिले आहे की, 'सौदीच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे तसेच 'डंकी'च्या टीमचे आणि ज्यांनी या शूटमध्ये सहकार्य केले, त्या सर्वांचे आभार. हे वेळापत्रक खूप छान पार पडले.
दिग्दर्शकाचे आभार - शाहरुख खान पुढे म्हणाला, 'शूटिंग शेड्यूल पूर्ण करण्यापेक्षा समाधानकारक काहीही नाही, राजू सर आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार. तसेच, सौदीच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार, ज्यांनी एवढी चांगली जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच चांगले काम केले'.