महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'डंकी'च्या सेटवरील शाहरुख आणि तापसी पन्नूचा फोटो लीक - शाहरुख खान डंकी

डंकी चित्रपटाच्या सेटवरील शाहरुख खानचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शाहरुख अभिनेत्री तापसी पन्नूसमोर गुडघे टेकलेला दिसत आहे.

डंकी सेटवरील फोटो लीक
डंकी सेटवरील फोटो लीक

By

Published : Jul 28, 2022, 3:09 PM IST

मुंबई- 'पठाण'नंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान 'डंकी' चित्रपटासाठी बिझी झाला आहे. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान आणि तापसी पन्नू दिसत आहेत. डंकी चित्रपटाच्या सेटवरील हा लीक झालेला फोटो असल्याचे सांगितले जात आहे. राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, शाहरुख आणि राजकुमार यांनी या चित्रपटाशी संबंधित माहिती दिली आहे.

लीक झालेल्या फोटोत काय आहे? - 'डंकी' चित्रपटाच्या सेटवरून लीक झालेला फोटो लंडनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. लीक झालेल्या या फोटोमध्ये शाहरुख खान चित्रपटाची लीड अभिनेत्री तापसीसमोर गुडघे टेकून बसला आहे. त्यावेळी शाहरुखच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या भूमिकेनुसार काहीसे गोंधळलेले दिसतात. या लीक झालेल्या फोटोमध्ये तापसीच्या चेहऱ्यावर एक लांबलचक हसू दिसत आहे.

डंकी सेटवरील फोटो लीक

आता हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यापेक्षा वेगाने पसरत आहे. या लीक झालेल्या फोटोमध्ये शाहरुख खानचा कॅज्युअल लूक दिसत आहे. त्याने तपकिरी चेक शर्टवर लाल जाकीट घातले आहे आणि त्याचे केस त्याच्या कपाळावर रुळले आहेत.

यापूर्वी डंकीच्या सेटवरील आणखी एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शाहरुख खान कारजवळ दिसला होता. या फोटोमध्ये शाहरुखने प्लेडेट शर्ट घातला होता. दरम्यान, तापसीचा आगामी चित्रपट 'दो बारा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

शाहरुख खानबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याच्या झोळीत 'डंकी', 'पठाण' आणि दाक्षिणात्य अभिनेता अॅटली कुमारचा 'जवान' असे अनेक चित्रपट आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर दार ठोठावणार आहे.

हेही वाचा -'शमशेरा'च्या अपयशावर करण मल्होत्रा ​​म्हणतो, 'द्वेष हाताळू शकलो नाही'!!

ABOUT THE AUTHOR

...view details