मुंबई - Jawan Inspired Ad :शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच धम्माल उडवून दिली. 'जवान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. दरम्यान, यात नयनतारा आणि विजय सेतुपतीशिवाय इतर कलाकारांनीही जबरदस्त अभिनय केला. या चित्रपटातील शाहरुख खानची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली. किंग खान 'जवान'मध्ये वेगवेगळ्या अवतारात दिसला. दरम्यान, या चित्रपटापासून प्रेरणा घेऊन एक जाहिरात करण्यात आली आहे, ज्यामध्ये शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील दिसत आहेत. ही जाहिरात खूप मजेदार आहे.
जाहिरातीत झळकले तीन सितारे :शाहरुख खान या जाहिरातीत 'जवान'मधील टक्कल लूकमध्ये दिसत आहे. आलिया भट्ट तिच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या डेब्यू सिनेमातून शनायाच्या भूमिकेत असून रणबीर कपूर 'बर्फी'मधील मर्फीच्या लूकमध्ये आहेत. या तिघांचीही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप रंजक वाटली आहे. शेवटी 'मला एकही डायलॉग नाही दिला गेला' हा रणबीरचा डायलॉगही खूप मजेशीर आहे. संपूर्ण जाहिरातीत शाहरुख हा आलियाशी मजबूत घर बांधण्याबाबत बोलताना दिसत आहे. शाहरुख आणि आलिया दोघेही रणबीरला शिवा, संजू, जग्गा आणि रॉकेट सिंग अशा वेगवेगळ्या पात्रांच्या नावांनी हाक मारताना दिसत आहे. याशिवाय या जाहिरात 'किंग खान' धमकी देखील देताना दिसत आहे.
चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया : जाहिरातीचा व्हिडिओ समोर येताच अनेक चाहते या जाहिरातीवर प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओबाबत लिहिलं की, 'जेव्हा 'जवान' शनाया आणि मर्फीला भेटतो तेव्हा अशी जाहिरात बनते' दुसऱ्या एकानं लिहिलं की, 'वाह वाह काय जाहिरात आहे' आणखी एकानं लिहिलं की, ' यांच्यावर एक चित्रपट बनवायला पाहिजे' अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. याशिवाय काही चाहत्यांनी या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत. काही जणांनी 'रणबीर यामध्ये सर्वात सुंदर दिसत होता, या शब्दांत त्याचं कौतुक केलं आहे. आता ही जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे.
वर्कफ्रंट :शाहरुख खान राजकुमार हिरानीच्या 'डंकी'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो सलमान खानच्या 'टायगर 3'मध्ये कॅमिओ साकारताना दिसेल. रणबीरबद्दल बोलायचं झालं तर तो 'अॅनिमल'मध्ये रश्मिका मंदान्नासोबत दिसणार आहे. याव्यतिरिक्त तो 'ब्रह्मास्त्र 2' मध्ये असेल, तर आलिया ही 'जिगरा', 'जी ले जरा' आणि 'ब्रह्मास्त्र 2'मध्ये झळकेल.
हेही वाचा :
- LEO Advance Booking : थलपथी विजयच्या 'लिओ'नं वाजला डंका; जागतिक अॅडव्हान्स बुकिंग 200 कोटीच्या जवळपास
- Mehreen Pirzada : वैवाहिक बलात्कारच्या सीनमुळे मेहरीन पिरजादा ट्रोल; दिलं सडेतोड उत्तर...
- Tiger 3 Movie : 'टायगर 3'च्या ट्रेलरला मिळत आहे पसंती ; सलमान खान आणि कतरिना कैफनं मानले चाहत्यांचे आभार...