मुंबई : सतीश कौशिक यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याचे अनेक मित्र सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका छताखाली जमले होते. सतीश कौशिक यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी, सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी गुरुवारी (१३ एप्रिल) एका खास मैफिलीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रसिद्ध बॉलीवूड लेखक जावेद अख्तर, शबाना आझमी, अनिल कपूर हे उपस्थित होते. ह्या सर्व प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याच्या बरोबर सतीशसोबत घालवलेले क्षण आठवून शबाना भावूक झाल्या, तरीही कौशिकसोबतच्या काही मजेदार आठवणी त्यांनी शेअर केल्या.
सतीश कौशिक हे उत्तम अभिनेते : शबाना आझमी यांनी सेलिब्रेशनदरम्यान सांगितले की, 'एकदा ते हातात एक्स-रे घेऊन नर्सिंग होममधून बाहेर पडले. तेव्हा श्याम बेनेगल, ज्यांनी सतीश कौशिक हे उत्तम अभिनेते असल्याचे कुणाकडून ऐकले होते, त्यांनी सतीश यांना बोलावून घेतले. श्याम बेनेगलनी सतीशला त्याचे एक्स-रे घेऊन त्याच्या घरी यायला सांगितले. सतीशने एक्स-रे बघितला आणि गमतीने म्हणाला, 'श्याम बाबू, मी एक्स-रे पाठवतो, कारण मी आतून खूप सुंदर आहे.'
सतीश हा 'दु:खी आत्मा' होता : 'रूप की रानी चोरों का राजा' फ्लॉप झाल्यामुळे सतीशला आत्महत्या करायची होती. तेव्हाची वेळ शबाना यांना आठवली. त्यांनी सांगितले की, 'चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो खूप दुःखी झाला होता आणि म्हणायचा की, 'मला आता मरावे लागेल' अशी त्याची भावना होती. तो पहिल्या मजल्यावर होता आणि त्याने खाली पाहिले कारण तो आत्महत्येचा मार्ग शोधत होता, तेव्हा तिथे एक पार्टी चालू होती. खाली बटाटे आणि वांगी तळली जात असल्याचे त्याने पाहिले. तर, तो म्हणाला, बटाटा वांग्याच्या मधोमध उडी मारून मी मेलो तर ते वाईट मरण असेल. या जुन्या आठवणी सांगताना आझमी हसल्या आणि त्याचवेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सतीशचे वंशिकावर खूप प्रेम होते : अभिनेत्रीने पुढे सांगितले की सतीश कौशिक आपली मुलगी वंशिकावर किती प्रेम करतो. त्या म्हणाल्या, 'सतीशचे त्यांच्या मुलीवर खूप प्रेम होते. मी बुडापेस्टमध्ये होते आणि मला त्याचा फोन आला, तो रडत होता आणि तो म्हणाला, 'मला कोविड झाला आहे आणि वंशिकालाही कोविड झाला आहे. ते आम्हाला एकत्र राहू देत नाहीत. लहान मुलीला क्वारंटाईन करण्यात आले आहे. ती एकटी काय करणार? तुम्ही काहीतरी करा, नाहीतर त्यांनी मला माझ्या मुलीपासून वेगळे केले तर मी मरेन.' अशा आठवणी शेअर केल्या. यावेळी शंकर महादेवन, उदित नारायण, साधना सरगम या गायकांनी सादरीकरण केले. यावेळी राणी मुखर्जी, सुभाष घई यांच्यासह इतर स्टार्स उपस्थित होते.
हेही वाचा :Satish Kaushik Birthday : सतीश कौशिक स्वप्नात आल्यानंतर अनुपम खेर दु:ख विसरले... 'हा' घेतला मोठा निर्णय