महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Shabaash Mithu trailer: अजिंक्य विजेती मिताली राजची विजय गाथा - तापसी पन्नू मिताली राज बायोपिक ट्रेलर

तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या 'शाबाश मिठू'चा ट्रेलर आता रिलीज झाला आहे. हा बायोपिक चित्रपट मिताली राजच्या दिग्गज क्रिकेटपटू बनण्याच्या आणि जगभरातील अब्जावधी मुली आणि महिलांसाठी प्रेरणास्थान बनण्याच्या प्रवासाविषयी आहे.

मिताली राजची विजय गाथा
मिताली राजची विजय गाथा

By

Published : Jun 20, 2022, 11:55 AM IST

Updated : Jun 20, 2022, 12:22 PM IST

मुंबई- तापसी पन्नू अभिनीत शाबाश मिठूच्या निर्मात्यांनी आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले आहे. या चित्रपटामध्ये एका जिद्दी मुलीने क्रिकेट खेळ कसा बदलला आणि जिंकण्याची सवय भारतीय संघाला लावली याची कथा पाहायला मिळते. राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आपल्या ट्विटरवरुन महान क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली.

दोन मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात मितालीच्या बालपणीच्या कथेपासून होते. ती पुढे कशी खेळू लागली, तिचा सराव, कर्णधारपद आणि क्रिकेटसारख्या खेळात एक महिला म्हणून येणाऱ्या अडचणींवर तिने कशी मात केली याविषयीची दृष्ये ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. यामध्ये तापसी म्हणते, "ऐसा खेल के दिखायेंगे के कोई हमारी पेहचान कभी कोई भूल ना पाये"

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23 वर्षांची दैदिप्यामान कारकिर्द गाजवणाऱ्या मितालीने अनेक विक्रमांना गवसणी घालत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा केल्या आहेत. हा चित्रपट तिच्या दिग्गज क्रिकेटपटू बनण्याच्या आणि जगभरातील अब्जावधी मुली आणि महिलांसाठी प्रेरणास्थान बनण्याच्या प्रवासा विषयी आहे. हा चित्रपट नुकत्याच निवृत्त झालेल्या क्रिकेटपटू मिताली राजला दिलेली सलामी आहे.

''नजरिया बदलो, खेल बदल गया''चा संदेश ट्रेलरमध्ये आकर्षक संवादांसह देण्यात आला आहे. यात मिताली राजची भूमिका अभिनेत्री तापसी पन्नूने साकारली आहे. सृजित मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट १५ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा -Fathers Day2022 : करण जोहर व्यतिरिक्त 'या' सिंगल फादर्सनी रचलाय पालकत्वाचा नवा आयाम

Last Updated : Jun 20, 2022, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details