हैदराबाद - अभिनेता ज्युनियर एनटीआर जो त्याच्या आरआरआर चित्रपटातील गाणे 'नाटू नाटू' ला पुरस्कार मिळाल्यानंतर टॉलिवूडमध्ये परतला आहे. संगीतकार एमएम कीरावानी आणि गीतकार चंद्रबोस यांनी ऑस्कर स्वीकारणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता, असे तो म्हणाला. 95 व्या ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर चालणारा ज्युनियर एनटीआर मंगळवारी रात्री उशिरा हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला तेव्हात्याच्या चाहत्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टीच्या प्रेमाशिवाय हा विजय शक्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांने केला. एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना ऑस्कर स्वीकारताना पाहणे हा सर्वोत्तम क्षण होता. मला 'आरआरआर'चा खूप अभिमान वाटतो. आमच्या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल मी प्रत्येक भारतीयाचे आभारतो. जागतिक स्तरावर, तसेच चित्रपट उद्योगातून व प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमामुळेच आम्ही हा पुरस्कार जिंकला.," असे ज्यनियपर एनटीआरने आयएनएशी बोलताना सांगितले.
ज्युनियर एनटीआर सोबत असलेले नाटू नाटू गाण्याचे नृत्यदिग्दर्शक प्रेम रक्षित म्हणाले की ही सर्वात चांगली गोष्ट होती आणि हा त्याच्यासाठी मोठा प्रवास होता. ऑस्कर नंतरची सर्वात चांगली भावना म्हणजे एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांनी मला मिठी मारली तेव्हाचा क्षण मंतरलेला होता. मी खूप धन्य झालो आहे, असे चार्टबस्टर नाटू नाटूच्या डान्स मास्टरने सांगितले.