महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SPKK Movie : 'सत्यप्रेम की कथा' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित, 'भूल भुलैया 2' चा रेकॉर्ड तोडू शकेल ? - हिट जोडी

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' आज, 29 जून रोजी थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. कार्तिक-कियारा दुसऱ्यांदा एकत्र रूपेरी पडद्यावर दिसत आहेत. 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातून ही हिट जोडी किती कमाल करते हे पाहणे महत्वपूर्ण असणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Jun 29, 2023, 11:40 AM IST

मुंबई :कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' आज, 29 जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. कार्तिक-कियाराचे चाहते या चित्रपटाची वाट फार आतुरतेने पाहत होते आणि अखेर हा चित्रपट आता रिलीज झाला आहे. कार्तिक-कियारा दुसऱ्यांदा एकत्र रूपेरी पडद्यावर दिसत आहेत. याआधी ही हिट जोडी 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली होती. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती. आता 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातून ही हिट जोडी किती कमाल करते हे पाहावे लागेल.

'सत्यप्रेम की कथा' चित्रपट रिलीज :दरम्यान, काल रात्री 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाची स्क्रिनिंग झाले, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आले होते. कियारा अडवाणी पती सिद्धार्थ मल्होत्रा आणि तिच्या आई-वडिलांसोबत या शोमध्ये पोहोचली होती. तर मृणाल ठाकूर ही कळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आली होती. या ड्रेसमध्ये ती फार देखणी दिसत होती त्यामुळे सर्वांचे लक्ष तिने वेधून घेतले होते. तसेच जॉनी लीव्हर आपल्या मुलीसोबत या शो आला होता. अतुल अग्निहोत्री आपल्या मुली आणि पत्नीसह येथे पोहचले होते. याशिवाय पूजा हेगड 'सत्यप्रेम की कथा'च्या स्क्रिनिंगला निळ्या रंगाच्या बॉडी-हगिंग ड्रेसमध्ये पोहोचली होती. तसेच या स्क्रिनिंगला कार्तिक देखील आला होता. कार्तिक काळ्या शर्टमध्ये फार सुंदर आकर्षक दिसत होता.

हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच खूप गाजला : 'सत्यप्रेम की कथा' ही एका अनोख्या प्रेम कथे भोवती फिरणारी आहे, समीर विद्वान दिग्दर्शित या चित्रपटात राजपाल यादव, गजराज राव, सुप्रिया पाठक, अनुराधा पटेल, शिखा तलसानिया यांच्यासह अनेक प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत. साजिद नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंट आणि नमह पिक्चर्स यांनी संयुक्तपणे या चित्रपटची निर्मिती केली आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा 2023 चा फार जबरदस्त चित्रपट आहे. कार्तिक आणि कियाराचा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच खूप गाजला होता. दुसरीकडे, आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पोहोचल्याने पहिल्याच दिवशी 8 ते 9 कोटी रुपयांची कमाई करू शकते अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कार्तिक आणि कियाराचा सुपर-डुपर हिट चित्रपट 'भूल भुलैया 2' ने पहिल्या दिवशी 14 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करेल हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. Lust stories season 2 : बॉलिवूड अभिनेत्री काजलने केले स्त्री सुखावर वक्तव्य
  2. Kangana Ranaut : बॉलिवूड क्वीन पोहोचली कामाख्या देवीच्या दर्शनाला...
  3. Rajkummar Rao : राजकुमार राव साकारणार शहीद भगतसिंगची भूमिका...

ABOUT THE AUTHOR

...view details