मुंबई - भूल भुलैया २ या हिट चित्रपटानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा समीर विद्वांस दिग्दर्शित सत्यप्रेम की कथा या चित्रपटातून एकत्र आली आहे. नमाह पिक्चर्ससह साजिद नाडियादवाला निर्मित ही एक निखळ आनंद देणारी प्रेमकथा आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने अलीकडेच सत्यप्रेम की कथा या चित्रपटाला सर्वांसाठीते U/A प्रमाणपत्र दिले आहे. १४६ मिनीटांचा हा कौटुंबीक मनोरंजन करणारा चित्रपट येत्या २९ जून रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे.
कार्तिक आणि कियारा यंच्या मुख्य भूमिका असलेला सत्यप्रेम की कथा हा चित्रपट भारतात २००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज करण्याचे लक्ष्य निर्मात्यांनी ठेवलंय. हिंदी चित्रपटसृष्टीतील बॉक्स ऑफिस स्पर्धेचा अभाव आणि २८ जुलै रोजी रॉकी और रानी की प्रेम कहानी रिलीज होण्याआधी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल. सत्यप्रेम की कथाला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास आणि एक महिन्याच्या कालावधीत प्रेक्षकांची पसंती मिळाल्यास, चित्रपटाचे कलेक्शन लक्ष वेधणारे असण्याची शक्यता आहे.
सत्यप्रेम की कथाचे आगाऊ बुकिंग सोमवारी सकाळी १० वाजता सुरू झाले आणि पीव्हीआर आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन प्रमुख राष्ट्रीय थिएटर चेनमधील प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. प्रगतीची सुरुवात चांगली झाली असली तरी, गतीवर लक्ष केंद्रित केले जाईल. चांगल्या सुरुवातीनंतर, चित्रपटाला आगाऊ तिकीट विक्रीची गती कायम राखणे आवश्यक आहे आणि बुधवारी रात्रीपर्यंत ३०००० तिकिटांच्या विक्रीची नोंद होणे अपेक्षित आहे.
कार्तिकच्या शेवटच्या शेहजादा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमी कामगिरी केल्याने त्याच्या उगवत्या स्टार पॉवरला मोठा धक्का बसला होता. सत्यप्रेम की कथाचे व्यावसायिक यश कार्तिकच्या कारकिर्दीच्या मार्गावर खूप मोठे आणि निर्णायक असेल. व्यापारातील चर्चा आणि सुरुवातीच्या दिवसाचा प्रारंभिक अंदाज सकारात्मक आहे, असे असले तरी पुढील दोन दिवसांच्या आगाऊ बुकिंग ट्रेंडच्या आधारे पहिल्या दिवसाचे स्पष्ट चित्र कळेल.