महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

SPKK box office collection day 7 : 'सत्यप्रेम की कथा'ने 50 कोटींचा आकडा पार केला, एका क्लिकवर चित्रपटाचे एकूण कलेक्शन पहा

'सत्यप्रेम की कथा' रिलीज होऊन सात दिवस झाले आहेत. पहिल्या वीकेंडच्या अखेरीस या चित्रपटाने 50 कोटींचा आकडा गाठला आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊया.

Satyaprem Ki Katha
सत्यप्रेम की कथा

By

Published : Jul 6, 2023, 11:35 AM IST

मुंबई :'सत्यप्रेम की कथा' २९ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने ओपनिंगवर ९.५ कोटींची कमाई केली होती. दरम्यान, रिलीजच्या सहाव्या दिवशी, चित्रपटाने एकूण ४६.७६ कोटी रुपयांची कमाई केली. आता या चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रिपोर्ट समोर येत आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाने गेल्या मंगळवारच्या तुलनेत थोडी चांगली कामगिरी केली आहे.

चित्रपटाची एकूण कमाई :'सत्यप्रेम की कथा'ने सुरुवातीच्या काळात रूपेरी पडद्यावर चांगली कामगिरी केली होती. दरम्यान, रिलीजच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी चित्रपटाचा वेग मंदावला. सोमवारी या चित्रपटाने ४ कोटींहून अधिकचा व्यवसाय केला असला तरी सहाव्या दिवशी केवळ ३.७५ कोटींची कमाई करू शकला. तर दुसरीकडे, बुधवारी म्हणजेच सातव्या दिवशी ४ कोटींचे कलेक्शन केले. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये एकूण ५०.७६ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.

१०० कोटीच्या कल्बमध्ये पोहचेल ? :कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट प्रेक्षकांना फार जास्त आवडत आहे. या चित्रपटाचे गाणे देखील फार हिट झाले आहे. हिट हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया २' नंतर या दोन्ही स्टार्सचा हा दुसरा चित्रपट आहे. जो रूपेरी पडद्यावर सध्याला जबरदस्त धमाल करत आहे. कार्तिक आर्यन कियारा व्यतिरिक्त या चित्रपटात सुप्रिया पाठक कपूर, गजराज राव, सिद्धार्थ रांदेरिया, अनुराधा पटेल, राजपाल यादव, निर्मित सावंत आणि शिखा तलसानिया यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच १०० कोटीच्या कल्बमध्ये पोहचेल अशी अपेक्षा केली जात आहे. आता या वीकेंडच्या शनिवार आणि रविवारी हा चित्रपट काय कमाल करेल हे काही दिवसात कळेल.

वर्कफ्रंट : कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो दिग्दर्शक हंसल मेहताचा आगामी चित्रपट 'कॅप्टन इंडिया'मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो अनुराग बसूच्या 'आशिकी 3' मध्ये दिसणार आहे. दरम्यान कियारा ही एस. शंकर यांच्या 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. Rocky Rani ki Prem kahani : करण जोहरच्या 'रॉकी रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार बॉलिवूडचे 'हे' कलाकार
  2. Bawaal Teaser OUT : 'बवाल'चा टीझर रिलीज, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा चित्रपट 'या' तारखेला रिलीज होणार
  3. Tejas gets release date : कंगना रणौतच्या तेजसची रिलीजची तारीख जाहीर, तेजसची गणपथशी बॉक्स ऑफिसवर टक्कर

ABOUT THE AUTHOR

...view details