मुंबई :कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' रिलीजच्या सहाव्या दिवसात आली आहे. हा चित्रपट गेल्या २९ जूनला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांचा प्रवास पूर्ण केला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली होती. आता या चित्रपटाची पाचव्या दिवसाची कमाई समोर आली आहे. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 38 कोटींची कमाई केली होती. दरम्यान, 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट पहिल्या सोमवारी (3 जुलै) रोजी कमकुवत ठरला आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा कमी कमाई केली आहे.
5 व्या दिवसाची कमाई : 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली, पहिल्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा होती, मात्र चित्रपटाच्या पाचव्या दिवसाच्या कलेक्शनने निर्मात्यांना घाम सोडला आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 4.25 कोटींची कमाई केली आहे. मात्र, चित्रपटाच्या ५व्या दिवसाच्या कमाईचा खरा आकडा अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, या चित्रपटाने पाच दिवसांत देशांतर्गत चित्रपटगृहांमध्ये 42 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आता हा चित्रपट दुसऱ्या वीकेंडकडे वाटचाल सुरू करत असून आता हा चित्रपट काय कमाल करतो हे पाहावे लागेल.