मुंबई: गेल्या वर्षीच्या ब्लॉकबस्टर 'भूल भुलैया-2'नंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी 'सत्यप्रेम की कथा'मध्ये पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. 29 जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट सध्याला जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाने तीन दिवसांत 26.35 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान रविवारी हा चित्रपट जबरदस्त कमाई करण्यात यशस्वी ठरला आहे.
'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद : समीर विद्वांस दिग्दर्शित रोमान्स ड्रामाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी या चित्रपटाने कमाईच्याबाबतीत घसरण घेतल्यानंतर आता या चित्रपटाने कमाईमध्ये वेग पकडला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, 'सत्यप्रेम की कथा' ने चौथ्या दिवशी म्हणजे वीकेंडच्या पहिल्या रविवारी सुमारे 12-12.80 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच शनिवारी या चित्रपटाने 10.10 कोटींची कमाई केली होती. चौथ्या दिवसाच्या कमाईनंतर चित्रपटाने देशांर्तगत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 38.35-39.15 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचा हिंदी मार्केटमध्ये एकूण 26.10% व्याप होता ज्याने रविवारी संख्या वाढली.
चित्रपटाची एकूण कमाई : 'सत्यप्रेम की कथा' ने शुक्रवारी (दुसऱ्या दिवशी) सुमारे 7.19 कोटी रुपयाचा गल्ला जमविला होता, जे 9.25 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या कलेक्शनपेक्षा 22 टक्के कमी होते. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी व्यतिरिक्त या चित्रपटात गजराज राव, शिखा तलसानिया, सुप्रिया पाठक, राजपाल यादव हे कलाकार देखील आहे. 'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी जेव्हा पाहिला तेव्हा या चित्रपटाबाबत प्रेक्षकांनी चांगले रिव्ह्यू दिले होते. काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषीत करून दिले होते.
'भूल भुलैया-2'पेक्षा जास्त कमाई करू शकणार? : आदिपुरुष आणि जरा हटके जरा बचके या आधीपासून चालू असलेल्या चित्रपटाला फार कमी प्रेक्षक बघायला जात आहे, 28 जुलै रोजी रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' प्रदर्शित होईपर्यंत 'सत्यप्रेम की कथा' जवळजवळ एकल रिलीज लाभांचा आनंद घेणार आहे. जर चित्रपटाची लोकप्रियता टिकवून ठेवण्यात यश आले तर हा चित्रपट 'भूल भुलैया-2'पेक्षा जास्त कमाई करू शकेल.
हेही वाचा :
- ZHZB collection day 30 : 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट कमाईच्याबाबतीत मागे पडला
- AA22 Release Dat : अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालणार
- Adipurus Collection Day 17 : 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो क्लीन बोल्ड....कारण काय?