महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Satish Shah : लंडनच्या हीथ्रो विमानतळावर वर्णद्वेषी अपशब्दांना सतीश शाह यांनी दिले चोख प्रत्युत्तर

अभिनेते सतीश शाह यांची वर्णद्वेषावरून खिल्ली उडवली गेली. बऱ्याच दिवसांनंतर सतीश शाह पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्यांच्या कामामुळे नाही तर लंडनच्या हीथ्रो विमानतळावरील (UKs Heathrow airport) कर्मचाऱ्यांना त्यांनी ट्विटमध्ये (Satish Shahs befitting response to racist) दिलेल्या गोड उत्तरामुळे. दिग्गज अभिनेत्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Satish Shah
सतीश शाह

By

Published : Jan 4, 2023, 1:37 PM IST

नवी दिल्ली :नुकताच लंडनच्या हीथ्रो विमानतळावर (UKs Heathrow airport) कर्मचार्‍यांपैकी कोणीतरी अभिनेते सतीश शाह यांना पाहिले आणि म्हणाले की, या लोकांना प्रथम श्रेणीचे तिकीट देखील परवडते का? असे म्हणत कर्मचारी हसू लागले. मात्र, सतीश यांनी न थांबता त्यांना चोख (Satish Shahs befitting response to racist) प्रत्युत्तर दिले.

सतीश शाह यांचे ट्विट व्हायरल झाले (Satish Shahs tweet went viral) : सतीश शहा यांनी केवळ या वर्णद्वेषी टिप्पणीकडे दुर्लक्ष केले नाही. ट्विट करून समर्पक प्रत्युत्तर देताना त्यांनी लिहिले की, मी हसलो आणि म्हणालो, 'कारण मी भारतीय आहे'. तो बोलता बोलता थांबला. मला पहिल्या वर्गात पाहून हिथ्रोचे कर्मचारी आश्चर्यचकित झाले. तो माझ्या समोर त्याच्या सोबतीला विचारू लागला की ह्या लोकांना फर्स्ट क्लास पण परवडेल का? हे उत्तर मी दिले. दिग्गज अभिनेत्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अनेक नेटिझन्सने अभिनेत्याच्या प्रतिसादावर प्रेम व्यक्त केले. एका व्यक्तीने लिहिले, 'उत्तम उत्तर! भारतीयांना त्यांच्याच भाषेत उत्तर देताना पाहून खूप आनंद झाला. आम्ही आता 'थर्ड वर्ल्ड कंट्री' होण्यापासून दूर आहोत! आम्ही एक महासत्ता आहोत...'

सतीश शाह यांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार : चाहते त्यांचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'वंशवाद ही अशी गोष्ट आहे, जी या परदेशी लोकांच्या मनात रुजलेली आहे आणि आपल्यापैकी बहुतेकांसमोर हे लोक दाखवतात की, त्यांच्या मनात आणि हृदयात वर्णद्वेष नाही.' दुसर्‍या युजरने लिहिले की, सर, तुम्ही तिथे म्हणायला हवे होते की दिल्ली, हैदराबादला या आणि तिथले विमानतळ बघा. हिथ्रोसारखे नाही. त्यांच्या विमानतळापेक्षा बरेच चांगले. मी नुकताच हिथ्रोला गेलो होतो. मला तिथे जुन्या मुंबईसारखा अनुभव आला.

सतीश शाहच्या वर्कफ्रंटबद्दल : तुम्हाला साराभाई आठवलेच असेल. त्यांच्या कॉमिक टायमिंग्स इतक्या परफेक्ट होत्या. 'जाने भी दो यारो' चित्रपटातील कमिशनर दिमेलो आणि 'साराभाई व्हर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) मधील इंद्रवदन साराभाई म्हणून ते घराघरात प्रसिद्ध झाले. आजही प्रेक्षकांच्या हृदयात ते या पात्रांद्वारे कायम स्मरणात आहेत. अभिनेता अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा भाग आहे. 'मैं हूं ना', 'ओम शांती ओम' आणि 'रा वन' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने उत्तम काम केले आहे, पण आजही तो 'साराभाई व्हर्सेस साराभाई'च्या इंद्रवदन साराभाईसाठी प्रसिद्ध आहे. सतीश शाह शेवटचे 2017 मध्ये 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मध्ये दिसला होता. या मालिकेचे फक्त 10 भाग ऑन एअर झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details