महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Vaibhavi Upadhyaya Dies : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात निधन - वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात

प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे हिमाचल प्रदेशात एका भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी २२ मे रोजी हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला होता.

Vaibhavi Upadhyaya Dies
अभिनेत्री वैभवी उपाध्याय मृत्यू

By

Published : May 24, 2023, 12:23 PM IST

मुंबई :छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा हिमाचल प्रदेशमध्ये कार अपघातात निधन झाले आहे. ती ३२ वर्षांची होती. शिवाय तिने अनेक मालिकेत आणि चित्रपटानमध्ये काम केले आहे. तिचे असे अचानक जाण्याने सिनेजगतात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात हा सोमवारी २२ मे रोजी हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. शिवाय हा अपघात फार भीषण होता त्यामुळे वैभवीचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी तिच्यासोबत तिचा पती देखील होता. दोघे हिमाचल प्रदेशात फिरायला गेले होते.

कसा झाला अपघात : अपघात हा कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला आहे. तसेच या अपघातात कार ही थेट दरीत कोसळली. तसेच तिचे कुटुंबीय तिचे पार्थिव हे मुंबईत आणत आहेत. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी, साराभाई वर्सेस साराभाई आणि अदालत अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केले आहे. तिला ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या मालिकेद्वारे विशेष ओळख मिळाली.

गुजराती कलाविश्वात मोठे नाव :साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेचे निर्माते जेडी मजेठीया यांनी वैभवीचे निधन झाल्याबद्दल दु;ख व्यक्त करून त्यांनी म्हटले, 'मला खरच खूप मोठा धक्का बसला आहे. ती एक सुंदर व्यक्ती होती शिवाय एक अफलातून अभिनेत्री होती. आयुष्य किती अनिश्चित आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.' तसेच वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. ती अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर रुपेरी पडद्यावर झळकली होती. त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. तिने अनेक गुजराती मालिकेत आणि चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे गुजराती कलाविश्वात तिचे नाव फार मोठे आहे. तसेच तिने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या सीरिजमध्ये देखील काम केले. तिने अभिनय क्षेत्रात तिने मोलाचे काम केले आहे. मात्र आता तिचा अभिनय तिच्या चाहत्यांना पाहता येणार नाही.

हेही वाचा :Khatron Ke Khiladi 13 : खतरों के खिलाडीचा सिझन 13 दक्षिण आफ्रिकेच्या जंगलात होणार शूट

ABOUT THE AUTHOR

...view details