मुंबई - Kartik Aaryan Birthday :बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आज त्याचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी त्याच्या चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, कार्तिकची एक्स गर्लफ्रेंड म्हणजेच अभिनेत्री सारा अली खाननं देखील त्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. सारा अली खाननं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार्तिक आर्यनसोबतचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या शेजारी बसून हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोझ देत आहेत. सारा आणि कार्तिकची जोडी 'लव्ह आज कल 2' चित्रपटामध्ये दिसली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही विशेष गाजला नाही.
कार्तिकची एक्स गर्लफ्रेंड सारानं केला फोटो शेअर : कार्तिकसोबतचा हा सुंदर फोटो शेअर करताना सारानं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅपी बर्थडे कार्तिक' ही पोस्ट तिनं कार्तिकला टॅग केली आहे. याशिवाय सारा अली खानची सावत्र आई आणि अभिनेत्री करीना कपूर खाननं देखील तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कार्तिक आर्यनचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं सुंदर कॅप्शन देत लिहिलं, 'हॅपी बर्थडे कार्तिक. खूप प्रेम आणि शुभेच्छा' आता कार्तिक आर्यन सिंगल आहे. त्याचे काही वर्षापूर्वी सारा अली खानसोबत ब्रेकअप झाले होते.