महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कथित लव्ह बर्ड्स सारा अली खान दिसली क्रिकेटर शुभमन गिलसोबत - पाहा व्हायरल व्हिडिओ - Alleged Love Birds

क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा अली खान यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा आणि शुभमन एकाच फ्लाइटमध्ये स्पॉट झाले आहेत.

सारा अली खान दिसली क्रिकेटर शुभमन गिलसोबत
सारा अली खान दिसली क्रिकेटर शुभमन गिलसोबत

By

Published : Oct 14, 2022, 2:57 PM IST

मुंबई - Sara Ali Khan Shubman Gill Video Viral: अभिनेत्री सारा अली खान आणि क्रिकेटर शुभमन गिल फ्लाइटमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघेही एकत्र कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. आता सारा-शुबमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा सारा-शुबमन एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. अनेक दिवसांपासून या कथित जोडप्याची चर्चा सुरू आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?- व्हायरल व्हिडिओमध्ये सारा अली खान लाल टॉप आणि व्हाइट लोहरमध्ये दिसत आहे. त्याचवेळी शुबमनने जीन्स आणि हुडी घातलेली असून विमानतळावर बॅग घेऊन जाताना दिसत आहे. यापूर्वी दोघेही पहिल्यांदाच एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. आता दोघेही विमानात एकत्र प्रवास करताना दिसले आहेत.

व्हायरल होत असलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सारा सेल्फी घेताना दिसत आहे आणि एक प्रवासी तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन गिल आणि सारा अली खान एकमेकांच्या शेजारी बसले आहेत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरला आहे.

सारा अली खानचे आजोबा मन्सूर अली खान पतौडी हे देखील क्रिकेटर होते. आता सारा लवकरच क्रिकेट स्टेडियममध्ये दिसणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मित्राने दिला होता डेटिंगचा इशारा!- याआधी शुभमनच्या एका मित्राने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक मोठी हिंट दिली होती. यानंतर सारा-शुबमनमध्ये काहीतरी सुरू असल्याचे सिद्ध होत होते. आता यूजर्सच्या नजरा या कथित कपलवर खिळल्या आहेत.

हेही वाचा -अँजेलिना जोलीसोबत विभक्त झाल्यानंतर ब्रॅड पिटने 'दुःखा'मधून शोधला आनंद

ABOUT THE AUTHOR

...view details