मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं अलिकडेच पार पडलेल्या मनीष मल्होत्रा दिवळी पार्टीत चमकदार पोशाखात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पार्टीत तिनं एक सुंदर लेहेंगा परिधान केला होता. त्यानंतर सारानं दोन आठवड्यांच्या कालावधीत पोटाची चरबी कमी करण्याचा तिचा प्रवास अभिमानाने दाखवत, स्वतःचा एक प्री-ट्रान्सफॉर्मेशन फोटो शेअर केलाय. सुरुवातीला संकोच वाटत असला तरी सारा अलीनं तिच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केलंय.
सोमवारी सारानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अलीकडील इव्हेंट्समधील ग्लॅमरस फोटोंचा कोलाज शेअर केला. तसंच पोटाची चरबी कमी करण्यासाठी तिनं काही काळ केलेल्या संघर्षाचाही उल्लेख केलाय. फोटोसह तिनं म्हटलंय, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर हा टॉपचा फोटो अपलोड करताना अस्वस्थ वाटतंय. पण हे सर्व मी 2 आठवड्यात साध्य करु शकले याबदद्ल मला अभिमान वाटतो. वजन वाढणं ही माझ्यासाठी नेहमीच अडचणीच ठरलंय आणि यासाठीच्या संघर्षात डॉ. सिद्धांत भार्गव आणि फुड दर्जी यांनी मला मार्गावर आणल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. बाय-बाय हॉलिडे कॅलरीज पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपराधीपणापासून शांतता मिळतेय. फिटनेस हा एक प्रवास आहे त्यामुळे पुढे जात राहिलं पाहिजे.'
पीसीओडी (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) मुळे वजन वाढतं, त्यामुळे या आव्हानाबद्दल सारा अलीनं नेहमीच चर्चा केलीय. कॉलेजमध्ये शिकत असताना तिचं वजन 96 किलो होतं. त्याकाळात तिनं अभिनय करण्याचा निर्णय घेतला, यासाठी तिला वजन कमी करणं अपरिहार्य होतं. हे ध्येय गाठण्यासाठी तिन खूप मोहनत घेतली.