पणजी - हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेली व्यक्तीरेखा म्हणजे 'मुघल-ए -आझम' चित्रपटातील मधुबालाने साकारलेली अनारकली. रविवारी, अभिनेत्री सारा अली खानने गोव्यातील 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात 'मुघल-ए-आझम' मधील मधुबालाच्या 'प्यार किया तो डरना क्या' गाण्यावर नृत्य करून सर्वांना नॉस्टॅल्जिक केले.
एथनिक पोशाखात सारा तिच्या अनारकली अवतारात शोभून दिसत होती. 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सारा अली खानने 'मुघल-ए-आझम' मधील 'प्यार किया तो डरना क्या', पाकिजा चित्रपटातील 'चलते चलते मुझे कोई मिल गया था', 'उमराव जान' मधील 'इन आँखों की मस्ती में', मुकद्दद का सिकंदर' मधील 'सलाम-ए-इश्क मेरी जान', 'देवदास' मधील 'मार डाल' आणि 'बाजीराव मस्तानी' मधील 'दीवानी मस्तानी' या गाण्यांवर डान्स करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.