मुंबई :बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज १२ ऑगस्ट रोजा आपला वाढदिवस साजरा करत आहे. हा दिवस सारासाठी खूप खास दिवस आहे. या खास प्रसंगी साराने तिच्या २८व्या वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सारासोबत तिची आई अमृता सिंग आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सारा कुटुंबासह साध्या कपड्यामध्ये दिसत आहे. याशिवाय ती आपल्या वाढदिवसाचा केक आई आणि भाऊसोबत मिळून कापत आहे. व्हिडिओमध्ये सारा साध्या कपड्यामध्ये खूप खास दिसत आहे.
साराने वाढदिवस आई आणि भावासोबत साजरा केला : साराची आई आणि भाऊ इब्राहिम हा व्हिडिओमध्ये तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय साराने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नाईट सूटमध्ये दिसत आहे आणि तिच्या केकवरील मॅजिकल मेणबत्ती पाहून मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान या पोस्टवर साराने लिहले आहे , 'ही मुलगी कोणाला घाबरत आणि शिवाय आपल्या बर्थडे केकला' असे तिने पोस्टवर कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये साराची आई आणि भाऊ देखील कॅज्युअल पोशाखात दिसत आहे.
सारा अली खानचे वर्कफ्रंट : साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती अखेरची अभिनेता विक्की कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात दिसली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १०० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनला होता, तरीही या चित्रपटाने चांगली कामगिरी बॉक्स ऑफिवर केली होती. या शिवाय सारा ही 'नखरेवाली', 'मेट्रो इन दिनो' 'मर्डर मुबारक' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये गुंतली आहे.
सारा अली खान नेट वर्थ : साराने पाच वर्षात ५० कोटींची कमाई केली आहे. अलिकडेच तिने मुंबईत एक घर घेतले आहे. याशिवाय सारा ही अनेक जाहिरातीमधून देखील कमाई करत आहे. फार कमी वयात तिने खूप मोठे स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केले आहे.
हेही वाचा :
- Jailer box office collection Day 2 : रजनीकांतच्या 'जेलर'ने दोन दिवसांत केली 'छप्परफाड' कमाई
- Movie The Rabbit House 'द रॅबिट हाऊस' या गूढ चित्रपटाचे 'टायटल लॉन्च', निर्मात्यांनी शेअर केली झलक
- Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : 'रॉकी और रानी...' ने पार केला २५० कोटींचा आकडा, देशा विदेशात वाजतोय यशाचा डंका