फ्रान्स:फ्रेंच रिव्हिएरामध्ये मंगळवारपासून 76वा कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. जगातील या सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सहभागी होत आहेत, त्यापैकी अनेकजण पहिल्यांदाच येथे पोहोचत आहे. अभिनेत्री सारा अली खानने मंगळवारी कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पहिल्याच आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर हजेरी लावली. कान्स पदार्पण करणाऱ्यांमध्ये अनुष्का शर्मा , ईशा गुप्ताही, मानुषी छिल्लर आणि सारा अली खान यांचा समावेश आहे. सारा अली खान पहिल्याच दिवशी कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर आली तेव्हा तिने तिच्या लूकने सर्वांनाच थक्क केले.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांच्या नजरा सारावर : या प्रसंगी सारा ही 'देसी ग्लॅम' वधूच्या स्टाईलमध्ये दिसली, या वेशभूशेत सारा ही मोहक दिसत होती. यावेळी तिच्या उपस्थितीचे कौतुक केल्या गेले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी, अभिनेत्री कान्स 2023 च्या उद्घाटन समारंभात तिच्या जबरदस्त ऑफ-व्हाइट 'लेहेंगा' मध्ये देसी झाली होती त्यामुळे तिथेल उपस्थित असणाऱ्याच्या नजरा तिच्यावर होत्या. तिच्या कान्स डेब्यूसाठी सुंदर ड्रेस भारतीय फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केली होती.