महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कान्समध्ये फ्यूजन साडी-डीप नेक ब्लाउज घालून सारा अली खानचे सौंदर्य प्रदर्शन - कान्स फेस्टिव्हलमधील सारा खानचा लूक व्हायरल

सारा अली खानने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती रेट्रो लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा नवीन लूक बघून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

Sara Ali Khan
सारा अली

By

Published : May 18, 2023, 3:22 PM IST

फ्रान्स : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ मध्ये आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करताना दिसत आहे. सुंदर दिसण्यासाठी सारा कोणतीही कसर सोडत नाही. सारा अली खानने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सारा काळ्या रंगाची बॉर्डर असलेल्या गाउन सारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या साडीत दिसत आहे. शिवाय तिने हॅल्टर नेक ब्लॅक आणि पांढऱ्या रंगाच्या ब्लाउजसह मण्याचा हार देखील घातला आहे. या रेट्रो लूकमध्ये सारा ही फार देखणी दिसत आहे. तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत एका चाहत्याने लिहिले, 'उर्स साराचा हा लूक मला तुझा आवडला. गुड वाइब्स आणि तुझ्यासाठी प्रेम.. उर द बेस्ट. 'दुसर्‍याने लिहिले, 'या ड्रेससह मेकअप आणि केस खूप चांगले दिसत आहे.! संपूर्ण लुकची अप्रतिम दिसत आहे. अशा अनेक कमेंट या फोटोवर आल्या आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ :कान्सच्या रेड कार्पेटवर साराने भारतीय पारंपारिक आणि आधुनिक भारतीय हस्तनिर्मित डिझाईन लेहेंगा घालून दुल्हन लूक केला होता. या लूकमध्ये सारा फार सुंदर दिसत होती. शटरबग्सशी बोलताना तिने म्हटले होते की, मला अभिमान आहे की, भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले. ती पुढे म्हणाली, हा ड्रेस अबू जानी आणि संदीप खोसला यांनी पारंपारिक आणि आधुनिक भारतीय हस्तनिर्मित डिझाईनने तयार केला आहे. मला माझ्या भारतीयत्वाचा नेहमीच अभिमान वाटतो, असे तिने म्हटले होते. तिच्या लेहेंगाप्रमाणेच साडीचा हा गाऊनदेखील अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे.

फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण :सारा व्यतिरिक्त, यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलेल्या बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये अनुष्का शर्मा, ईशा गुप्ता, दीपिका पदुकोण, मानुषी छिल्लर आणि मृणाल ठाकूर उर्वशी रौतेलाने या अभिनेत्रींचा समावेश आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मे रोजी सुरू झाला आणि 27 मे रोजी संपणार आहे. हा महोत्सव 1946 पासून साजरा केला जातो आणि या महोत्सवात चित्रपट निर्मात्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी आणि प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी स्पर्धा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देत असतो.

हेही वाचा :

  1. Cannes Film Festival 2023 : उर्वशीच्या दुसऱ्या दिवसाच्या लूकने सोशल मीडियावर चांगलीच उडवून दिली खळबळ
  2. Neetu Kapoor buys luxury apartment : आलिया भट्टने करोडोंचे घर खरेदी केल्यानंतर नीतू कपूरने खरेदी केली लक्झरी अपार्टमेंट
  3. Satya Prem Ki Katha: म्यूझिकल रोमान्सचा अनुभव देणाऱ्या सत्य प्रेम की कथाचा टिझर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details