महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sara Ali visited Kartiks home : कार्तिक आर्यनच्या घरी सारा अली खान, तर्क-वितर्कांना उत - सारा आणि कार्तिक आर्यन डेट

Sara Ali visited Kartiks home : अभिनेत्री सारा अली खानने कार्तिक आर्यनच्या घरी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी सारा अली आणि कार्तिक यांनी काढलेला फोटो व्हायरल झाला आहे. दोघे बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानं दोघांच्याही चाहत्यांमध्ये उत्साह दिसत आहे.

Sara Ali visited Kartiks home
कार्तिक आर्यनच्या घरी सारा अली खान

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 3:48 PM IST

मुंबई - Sara Ali visited Kartiks home : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या मुबंईतील घरी गणपती बप्पाचे आगमन झालंय. बाप्पाच्या दर्शनासाठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी त्याच्या घरी भेट दिली. बुधवारी रात्री अभिनेत्री सारा अली खान आणि डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती. यापूर्वी सारा आणि कार्तिक आर्यन डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता ही जोडी मनीष मल्होत्रा आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्यासोबत एका फोटोत झळकली आहे.

साराचा हा फोटो आणि व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला आणि 'सार्टिक'च्या चाहत्यांनी त्यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फोटोंमध्ये सारा आणि कार्तिक, मनीष आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानीसोबत पोज देताना दिसत आहेत. गुलाबी रंगाच्या सुंदर सूटमध्ये सारा अली खान खूपच सुंदर दिसत होती. तर कार्तिक आर्यन पांढऱ्या प्रिंटेड कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे.

कार्तिक आर्यन आणि सारा अली खानला एकाच फोटो फ्रेममध्ये पाहून चाहत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. कार्तिक सारा विवाहित जोडप्यासारखं दिसत असल्याचं, एका युजरनं म्हटलंय. कार्तिकसोबत सारा तिथं काय करतेय, अशी एकाची प्रतिक्रिया आहे. दोघे पुन्हा एक झाले, अशाही एकाची कमेंट आहे. ते दोघे पुन्हा एकत्र येतील अशी खात्रीही काहीजण व्यक्त करत आहेत.

यापूर्वी जेव्हा सारा आणि कार्तिक इम्तियाज अलीच्या 'लव्ह आज कल' चित्रपटामध्ये एकत्र काम करत होते, तेव्हा दोघे डेटिंग करत असल्याची चर्चा रंगली होती. नंतर ते विभक्त झाल्याचीही अफवा पसरली होती.

कार्तिकच्या घरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर त्याचा फोटो त्यानं सोशल मीडियावर शेअर केला होता. 'अरे आमचे नशीब की बाप्पा पुन्हा आमच्या घरी आले. गणपती बाप्पा मोरया.', असं त्यानं फोटोच्या कॅप्सनमध्ये लिहिलं होतं.

कामाच्या आघाडीवर कार्तिक आर्यन 'चंदू चॅम्पियन' या कबीर खानच्या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 14 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात कार्तिक आणि दिग्दर्शक कबीर खान पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. हंसल मेहताचा आगामी चित्रपट 'कॅप्टन इंडिया' आणि अनुराग बसूच्या 'आशिकी 3' मध्ये देखील कार्तिक आर्यन दिसणार आहे.

सारा अली खान अनुराग बसू दिग्दर्शित आगामी 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अनुपम खेर, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका असतील.

हेही वाचा -

१.Akhil Mishra Passes Away : 'थ्री इडियट' फेम अभिनेता अखिल मिश्राचं निधन, सुझान बर्नेटवर दुःखाचा डोंगर कोसळला

२.Womens Reservation Bill : महिला किती शक्तिशाली आहेत याची जाणीव त्यांना नसते : आशा भोसले

३.Kareena Kapoor birthday : करिष्मा कपूरने दिल्या करीनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सेलेब्रिशनचे फोटो शेअर

ABOUT THE AUTHOR

...view details