मुंबई - IFFI 2023 : हिंदी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सारा अली खान तिच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, गोव्यात झालेल्या 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात साराच्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज केलं. या कार्यक्रमात साराबरोबर करण जोहरही होता. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. सारा अली खान नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते. ती अनेक चित्रपटांमध्ये ग्लॅमरस अवतारात दिसली आहे. ती 'ए वतन मेरे वतन' मध्ये पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
'इफ्फी'मध्ये मोशन पोस्टर रिलीज :सारा अली खान आणि करण जोहर यांनी 54व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ए वतन मेरे वतन'चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज केल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केलं आहे. 'ए वतन मेरे वतन' सारा अली खान अभिनीत एक थ्रिलर ड्रामा आहे, ज्यात ती स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारत आहे. करण जोहर आणि सारा अली खान यांनी सोमवारी, 20 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया हँडलवर 'ए वतन मेरे वतन'चे नवीन मोशन पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये साराचे पात्र मायक्रोफोनमध्ये बोलताना दिसत आहे. 'ए वतन मेरे वतन'च्या मोशन पोस्टरमध्ये ती पांढऱ्या रंगाची खादीची साडीमध्ये आहे. तिनं कपाळावर बिंदी लावली आहे. सारा अली खानचा हा लूक लक्षवेधी आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित राहिले.