मुंबई :अभिनेता सैफ अली खान आज १६ ऑगस्ट रोजी त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त पतौडी कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. सैफच्या वाढदिवसानिमित्त सारा अली खान आणि इब्राहिम अली खान भेटवस्तू घेऊन त्याच्या घरी पोहोचले आहेत. सारा आणि इब्राहिमचा सैफच्या घरी पोहचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सारा भाऊ इब्राहिम अली खानसोबत सैफच्या इमारतीत वाढदिवसाठी फुगे घेऊन जाताना दिसत आहे. साराने पकडलेल्या फुग्यामध्ये एका फुग्यावर 'बेस्ट डॅड' असे लिहिले आहे.
सारा आणि इब्राहिम वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचले :दरम्यान यावेळी साराने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. या देसी अवतारात ती खूप खास दिसत आहे. तर इब्राहिमने ग्रे रंगाचे टी-शर्टसह निळ्या रंगाचा जीन्स घातल आहे. या लूकला आणखी खास बनविण्यासाठी त्याने यावर सनग्लासेस लावले आहेत. या लूकमध्ये तो खूपच देखणा दिसत आहे. सारा आणि इब्राहिम ही सैफ आणि अमृता सिंग यांची मुले आहेत. सैफ आणि अमृता सिंगचे लग्न १९९१मध्ये झाले होते. याशिवाय या दोघांनी २००४मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर अमृता सिंग ही आपल्या मुलांसह सैफपासून वेगळी राहते.