महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Maanayata Dutt Birthday : सजंय दत्तने 'आई' म्हणत मान्यताला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! - संजय दत्त आणि पत्नी मान्यता

संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा आज वाढदिवस आहे. मान्यता आपला वाढदिवस मुलांसोबत देशाबाहेर साजरा करत असून तिने वाढदिवसाच्या सेलेब्रेशनचे काही खास फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. दरम्यान पत्नी मान्यता दत्तला वाढदिवसानिमित्य संजय दत्तने खास पोस्ट शेअर करून सदिच्छा दिलाय.

Maanayata Dutt
मान्यता दत्त

By

Published : Jul 22, 2023, 6:44 PM IST

मुंबई :बॉलिवूड अभिनेता संजय दत्तसाठी २२ जुलै हा दिवस खूप खास असून त्याची पत्नी मान्यता दत्तचा आज वाढदिवस आहे. मान्यता २२ जुलै २०२३ रोजी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी मान्यता दत्त तिचा वाढदिवस तिच्या दोन मुलांसह देशाबाहेर साजरा करत आहे. दरम्यान आता मान्यताने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये फक्त तिचे दोन मुलच तिच्यासोबत दिसत आहे. फोटोमध्ये कुठेच संजय दत्त दिसत नाहीे. मान्यता २०२० पासून तिच्या दोन्ही मुलांसह दुबईला राहते. संजयला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अनेकवेळा दुबईला जावे लागते. संजय दत्तची मुले शिक्षणासाठी दुबईत आहेत.

मान्यता दत्तने मुलांसह केक कापला : शेअर झालेल्या फोटोंमध्ये मान्यता आपल्या दोन मुलांसोबत केक कापत असून ती बाहेर फिरताना दिसत आहे. फोटो शेअर करत मान्यताने कॅप्शनमध्ये लिहले की, 'ती तिचे प्रेम संजय दत्तला खूप मिस करत आहे.' दरम्यान आता संजय दत्तने पत्नीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत एक खास वाढदिवसाची विश पोस्ट लिहिली आहे.

संजय दत्तची पोस्ट : 'प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि देव तुला आनंद, यश आणि शांती देवो, आई माझ्या जीवनात राहिल्याबद्दल आणि माझा आधार, माझी शक्ती असल्याबद्दल धन्यवाद, आणि मुख्यतः तू मला दिलेल्या दोन सुंदर मुलांबद्दल धन्यवाद, तू माझ्या आयुष्यात खडकासारखी उभी राहिलीस आणि मी पडताना तू मला नेहमीच उचलले, तू माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी लढली आहेस. मी एक भाग्यवान माणूस आहे, की तू माझ्या जीवनात पत्नी रूपात मला मिळाली, याबद्दल मी देवाचा खूप आभारी आहे. याव्यतिरिक्त मी तुला सुद्धा धन्यवाद म्हणतो. धन्यवाद आई आणि एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मी माझ्या आयुष्यात तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो', असे पोस्टमध्ये संजय दत्तने लिहले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details