मुंबई- बॉलिवूडमधील अनेक अभिनेते तंदुरुस्त शरीराचा अभिमान बाळगू शकत नाहीत. परंतु संजय दत्त याला अपवाद आहे, त्याने आपल्या स्नायूंच्या मजबूत बांधणीने वय हा फक्त एक आकडा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शुक्रवारी, संजय दत्तने वर्कआउट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. यात तो लाकडाचा ओंडका कुऱ्हाडीचे अथक घव घलत तोडताना दिसते आहे.
व्हिडिओ शेअर करताना, त्याने कॅप्शन दिले: मूलभूत गोष्टींकडे परत जात, 'कच्चा वर्कआउट! लाकूड तोडणे हा वर्कआउट करण्याचा एक उत्तम प्रकार आहे, संपूर्ण शरीराच्या वरच्या भागावर काम करतो, चांगली मेहनत केली, पुढे चालू ठेवावे लागेल, हे करून पहा. तुम्हालाही ते आवडेल', असे त्याने लिहिलंय.
संजय दत्तने व्हिडिओ शेअर करताच, त्याच्या अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये हार्ट आणि फायर इमोटिकॉनचा पाऊस पाडला. काही जणांना त्याने केलेला हा प्रकार आवडला नाही. त्याची खिल्लूी उडवत त्याला त्याच्या तुरुंगातील दिवसांची आठवण करुन दिली. व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका सोशल मीडिया युजरने लिहिले: 'संजू बाबा तुरुंगात जे करायचे ते इथे करत आहे'. दुसऱ्याने लिहिले की, 'तुम्ही जे काम करत आहात ते आम्ही आजोबांसोबत केले आहे, फरक इतकाच आहे की तुम्ही व्यायाम म्हणून करत आहात आणि आम्ही पोट भरण्यासाठी करत होतो.'
1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटासाठी संजय दत्तला तुरुंगात टाकण्यात आले होते. तुरुंगातील त्याच्या काळाबद्दल बोलताना तो म्हणाला की तो वेळ त्याने वर्कआउटमध्ये घालवला. 'मी पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होतो. मी माझ्या कुटुंबाबद्दल, विशेषत: माझ्या मुलांबद्दल रडत असे. पण नंतर मी स्वतःला सावरले आणि मेहनत करु लागलो.'