महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Sanjay Dutt : संजय दत्त आणि प्रिया दत्तने वाहिली आई नर्गिसला श्रद्धांजली - Sanjay Dutt paid tribute

संजय दत्तने गुरुवारी आई नर्गिस दत्तच्या ९४ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच संजय दत्तची बहीण प्रिया दत्त हिनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर करून आई नर्गिसचे स्मरण केले आहे.

Sanjay Dutt
संजय दत्त

By

Published : Jun 1, 2023, 5:06 PM IST

मुंबई : अभिनेता संजय दत्तने गुरुवारी आई नर्गिस दत्तच्या ९४ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. इंस्टाग्रामवर संजयने त्याच्या आईचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, 'माझ्या मार्गदर्शक प्रकाशाला, वाढदिवसाच्या शुभेच्छा, आई. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझी नेहमी आठवण येते.' असे लिहले. नर्गिस यांनी कॉमेडीपासून तर नाटकापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका या रूपेरी पडद्यावर साकरल्या. नर्गिस यांना सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

वयाच्या पाचव्या वर्षी चित्रपटसृष्टीत केले पदार्पण :नर्गिस यांनी 1940च्या दशकापासून आपल्या करिअरची सुरूवात केली. त्या अनेक चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकत होत्या. नर्गिस यांनी 1967 पर्यंत अभिनय केला. त्यांचा शेवटचा चित्रपट 'रात और दिन' हा होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी तलाश-ए-हक (1935) मधून छोट्या भूमिकेत पदार्पण केले. परंतु त्यांचा अभिनय कारकीर्द प्रत्यक्षात तमन्ना (1942) या चित्रपटापासून सुरू झाली. संजय दत्तची बहीण प्रिया दत्त हिनेही तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केली, ज्यात तिने कॅप्शन दिले, वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या देवदूताला, 'मी तिला पाहू शकत नाही पण, मला माझ्या संवेदच्या प्रत्येक टप्प्यावर तिची उपस्थिती जाणवते, मला माहित आहे की तिचे शारीरिक रूप मला अनेक वर्षांपूर्वी सोडून गेले होते. तिचे हसणे, तिची कळकळ,तिची प्रेमळ काळजी या सुंदर आठवणी तिने सोडल्या आहेत जरी ती नसली तरी तिचे सार माझ्यासोबत कायम आहे'.

नर्गिस यांचा मृत्यू : 80 च्या दशकाच्या सुरुवातीस, नर्गिसला स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याने 3 मे 1981 रोजी त्यांचा मृत्यू झाला. नर्गिस आणि अभिनेता सुनील दत्त त्यांच्या 1957च्या 'मदर इंडिया' चित्रपटाच्या सेटवर आग लागली होती. या आगेतून सुनील दत्तने नर्गिस यांना वाचवले. त्यानंतर नर्गिस या सुनील दत्तच्या प्रेमात पडल्या. दुखापतीतून बरे होत असताना ते जवळ आल्याचे सांगण्यात येते . 11 मार्च 1958 रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधली. नर्गिस यांचा 1957मध्ये आलेला चित्रपट मदर इंडियासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार दिला होता. 1960 च्या दशकानंतर त्या क्वचितच चित्रपटांमध्ये दिसत होत्या. तसेच त्यांचा 1967मध्ये ' रात और दिन' हा चित्रपट आला होता , ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. नर्गिस यांनी पती सुनील दत्तसोबत अजिंठा कला संस्कृती मंडळाची स्थापना केली. त्याचबरोबर त्यांनी अनेक भागात स्टेज शो आयोजित केले होते. तसेच वार्षिक चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा पुरस्कार त्यांच्या सन्मानार्थ नर्गिस दत्त पुरस्कार म्हणून ठेवण्यात आला आहे. 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस, नर्गिस द स्पास्टिक सोसायटी ऑफ इंडियाच्या पहिल्या संरक्षक बनल्या आणि त्यानंतरच्या संस्थेसोबतच्या कामामुळे त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख मिळाली आणि नंतर 1980मध्ये राज्यसभेसाठी त्यांनी नामांकन मिळाले. नर्गिस दत्त या राज्यसभेवर दोन वर्षे होत्या. त्यांना 1958 मध्ये पद्मश्रीनेही सन्मानित करण्यात आले होते. संजय दत्तच्या बायोपिक चित्रपट 'संजू'मध्ये अभिनेत्री मनीषा कोईरालाने नर्गिसची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा :

  1. Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने व्हिडिओतून जागवल्या सुशांत सिंग राजपूतसोबतच्या आठवणी
  2. R Madhavan : वाढदिवसाच्या दिवशी आर. माधवन दिसला शुटिंगमध्ये व्यग्र
  3. Sara Ali Khans Reply to Trollers : मंदिर भेटीनंतर ट्रोल करणाऱ्यांना सारा अली खानचे चोख प्रत्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details