महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तला लग्नाआधी बनायचं आहे आई, केली इच्छा व्यक्त - संजय दत्त आणि त्रिशाला दत्त

Trishala Dutt Baby Planning : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तला लग्नाआधी आई होण्याची इच्छा आहे. तिनं 'आस्क मी एनीथिंग' सत्रात तिची इच्छा व्यक्त केली आहे.

Trishala Dutt Baby Planning
त्रिशाला दत्तची बेबी प्लॉनिंग

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 5:29 PM IST

मुंबई- Trishala Dutt Baby Planning: हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता संजय दत्तची लाडकी मुलगी त्रिशाला दत्त कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता पुन्हा एकदा संजू बाबाची मुलगी चर्चेत आली आहे. त्रिशालानं लग्नाआधी आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिनं तिच्या होणाऱ्या मुलांच्या नावाचाही विचार केला, असं तिनं सांगितलं आहे. अलीकडेच त्रिशालानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'आस्क मी एनीथिंग' सत्र आयोजित केले होते. या सत्रामध्ये काही यूजरनं त्रिशालाला विचारले. या प्रश्नाच्या उत्तर तिनं अतिशय सुंदर पद्धतीनं दिली आहेत. या सत्रादरम्यान एका यूजरनं तिला विचारलं, 'तुम्ही कधी तुमच्या होणाऱ्या मुलांबद्दल आणि त्यांच्या नावाबद्दल विचार केला आहे काय?

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तला बनायचं आहे आई : संजय दत्तची मुलगी त्रिशालानं या प्रश्नावर उत्तर दिलं 'होय, मुलांबद्दल विचार केला आहे. मला मूल हवे आहेत. मी नावांचाही विचार देखील केला आहे. जर देवाने माझ्यासाठी सर्वकाही माझ्यासाठी प्लान केलं असेल तर, मलाही आई व्हायला आवडेल. त्रिशाला दत्त ही 35 वर्षांची आणि अविवाहित आहे. ती अमेरिकेत तिच्या आजी-आजोबांसोबत राहते. ती मानसोपचारतज्ज्ञ आहे. त्रिशाला तिच्या लव्ह लाईफमध्ये फारशी भाग्यवान नाही. काही वर्षांपूर्वी एका रोड अपघातात तिच्या बॉयफ्रेंडचे निधन झाले होते. याचा खुलासा खुद्द तिनं केला होता. या धक्क्यातून बाहेर यायला दोन वर्षे लागली, असं तिनं सांगितलं होतं.

संजय दत्तची मुलगी खूप ग्लॅमरस :आता वयाच्या 35 व्या वर्षी त्रिशाला एकटीच राहत आहे. ग्लॅमरच्या बाबतीत त्रिशाला कोणत्याही हिरोईनपेक्षा कमी नाही. ती अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वी तिनं अभिनेता रणबीर कपूरसोबत डिनर करत असतानाचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. त्रिशाला ही अभिनय क्षेत्रापासून लांब आहे, मात्र तरीही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. संजय दत्त अनेकदा त्रिशाला भेटण्यासाठी अमेरिकेत जात असतो.

हेही वाचा :

  1. धनुष अभिनेता नागार्जुन आणि शेखर कममुलासोबत सुरू करणार 'डी51'चे शूटिंग
  2. 'इंडियन पोलिस फोर्स'च्या प्रमोशनदरम्यान दिग्दर्शक रोहित शेट्टीनं केली 'गोलमाल 5'ची पुष्टी
  3. 'भक्षक' चित्रपटात भूमी पेडणेकर दिसेल एका शोध पत्रकाराच्या भूमिकेत

ABOUT THE AUTHOR

...view details