मुंबई- ऊं अंटावा या गाण्यातील किलर मूव्ह्सने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू तिच्या आगामी 'यशोदा' चित्रपटात सरोगेट मदरची मुख्य भूमिका साकारणार आहे. हिंदी ट्रेलरने यूट्यूबवर 1.8 मिलियनचा आकडा पार केला आहे.
हिंदीतील वरुण धवन, तेलुगूमध्ये विजय देवरकोंडा, मल्याळममध्ये दुल्कर सलमान, तामिळमध्ये सुरिया आणि कन्नडमध्ये रक्षित शेट्टी यासारख्या भारतीय मनोरंजन उद्योगातील काही मोठ्या सेलेब्रिटींनी गुरुवारी चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. आदित्य मुव्हीजच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर यशोदा हिंदी ट्रेलरने 1.8 दशलक्ष व्ह्यूज ओलांडले आहेत.
ट्रेलरमध्ये एक आकर्षक थ्रिलरचे आश्वासन प्रेक्षकांना मिळाले आहे. यात सामंथा संघर्ष करताना दिसत असून या कथेत ती धैर्याने गंभीर वैद्यकीय गुन्ह्याचे रहस्य उलगडताना दिसणार आहे.