महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Samantha Ruth Prabhu : समांथान शेअर केले बालीतील नवीन फोटो, अ‍ॅक्टींग ब्रेकचा उठवतेय पुरेपुर फायदा - अ‍ॅक्टींग ब्रेकचा उठवतेय पुरेपुर फायदा

सामंथा रुथ प्रभू सध्या बालीमध्ये तिच्या मित्रिणीसोबत चांगला वेळ घालवत आहे. सामंथाने अ‍ॅक्टिंगमधून ब्रेक घेतला आहे. या ब्रेकचा ती पुरेपूर फायदा घेत आहे. आता नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. चला पाहूया व्हिडिओ...

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू

By

Published : Jul 28, 2023, 5:42 PM IST

मुंबई :साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या अ‍ॅक्टिंग ब्रेकवर आहे. समांथाने एका वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेतला असून सध्या ती तिच्या मनाला शांती आणि विश्रांती देण्यासाठी देशाबाहेर फिरत आहे. सामंथाने काही दिवसापूर्वीच तिच्या आजाराबद्दल सांगितले होते. या आजारामुळे तिची मनाची शांती भंग झाली होती. शांततेसाठी देशाबाहेर फिरत असून आनंदी राहण्यासाठी विविध गोष्टी करत आहे. समांथा सध्या मैत्रिण अनुषा स्वामीसोबत बालीमध्ये असून या दोघी तिथे खूप एन्जॉय करत आहे. दरम्यान आता समांथा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.

समांथाने सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर : नुकतेच समांथाने काही सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये समांथा आणि तिची बेस्ट फ्रेंड अनुषासोबत सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य पाहत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये समांथा आणि अनुषा सुंदर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही शॉर्ट्स आउटफिटमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये समांथा आणि अनुषा खूप खास दिसत आहेत.

समांथाची कुठल्या आजाराने घेरले : समांथाला मायोसिटिस नावाच्या आजाराने ग्रासले आहे, ज्यामुळे ती तिचे मन शांत ठेवू शकत नाही आहे. हा आजार एक प्रकारे व्यक्तीमध्ये अस्वस्थता निर्माण करतो आणि आतून देखील अस्वस्थ करतो. या आजारामुळे समांथाला तिच्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नव्हते. आता या आजारातून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी तिने एक वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आहे. सामंथाचा आगामी चित्रपट 'खुशी' आहे ज्यामध्ये ती दक्षिणेतील अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसली आहे. 'खुशी' या चित्रपटातील गाणे खूप गाजले आहे. हा चित्रपट १ सप्टेंबर २०२३ रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून समांथाला खूप अपेक्षा आहे, कारण यापूर्वी तिचा 'शाकुंतलम' हा चित्रपट फार काही प्रेक्षकांवर जादू करू शकला नाही आहे. त्यामुळे 'खुशी' चित्रपटाद्वारे तिला प्रेक्षकांचे मन जिंकायचे आहेत.

हेही वाचा :

  1. Ankush release date : मंगेश देसाई आणि केतकी माटेगावकर नव्या धमाक्यासाठी सज्ज, 'अंकुश' प्रदर्शनाच्या वाटेवर
  2. Hrithik Roshan and Saba Azad : सबा आझादने हृतिक रोशनसोबत घालवला चांगला वेळ ; सोशल मीडियावर फोटो शेअर
  3. 'Rocky Aur Rani..' Twitter review: 'रॉकी और रानी...' ट्विटर रिव्ह्यूमध्ये विभागले रणवीर आलियाचे चाहते

ABOUT THE AUTHOR

...view details