महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kushi shoot at temple : मंदिरात शूटिंग सुरू असताना सामंथा आणि विजय देवराकोंडाचा व्हिडिओ व्हायरल - आंध्रप्रदेशातील एका मंदिरात शुटिंग

सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा नुकतेच आंध्रप्रदेशातील एका मंदिरात शुटिंग करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कलाकारांचे काही पडद्यामागचे फोटो आणि व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत.

Kushi shoot at temple
सामंथा आणि विजय देवराकोंडाचा व्हिडिओ

By

Published : Jul 5, 2023, 5:00 PM IST

मुंबई- अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा आगामी रोमँटिक चित्रपट कुशी शुटिंगच्या काळात माध्यमांसह सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मंदिरात शुटिंग सुरू असताना पडद्यामागील काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे आगामी चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली.

सोशल मीडियावर फॅन पेजद्वारे पोस्ट केलेल्या बीटीएस व्हिडिओंपैकी एकामध्ये, सामंथा आणि विजय देवराकोंडा हे आंध्र प्रदेशातील द्राक्षराम मंदिरात पूजा करतानाचे दृश्य चित्रित करताना दिसत आहेत. यात लाल रंगाच्या साडीमध्ये सामंथा सुंदर दिसत आहे. दुसरीकडे विजय पारंपारिक धोतीमध्ये धडाकेबाज दिसत होता.

कुशीच्या सेटवरील लेटेस्ट झलकांनी चाहत्यांना आनंदित केले आणि विजय आणि सामंथाचा ऑन-स्क्रीन रोमान्स कसा उलगडतो हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कुशी चित्रपटाच्या मंदिराच्या चित्रीकरणातील झलक पाहून चित्रपटप्रेमी आणि चाहते खूप खूश आणि उत्साहित झाले आहेत. सामंथाला मायोसिटिसचे निदान झाल्यानंतर कुशीचे शूटिंग थांबवण्यात आले होते. एप्रिल २०२२ मध्ये शुटिंग फ्लोरवर गेलेला हा चित्रपट १ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हा चित्रपट शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात आहे आणि टीम लवकरच शिव निर्वाण दिग्दर्शित या चित्रपटाची घोषणा करणार आहे. कुशीसह, निर्माते प्रेक्षकांसाठी एक विशिष्ट आणि सुंदर सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या खात्रीसह एक अपारंपरिक प्रेमकथा शोधत असल्याचे म्हटले जाते. हा चित्रपट विजय आणि सामंथा यांचा दुसरा एकत्रित चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी कीर्ती सुरेशच्या महानटी या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. हे दोन लोकप्रिय कलाकार एकत्र काम करत असल्यामुळे दोघांच्याही चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाची लहर तयार झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details