महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

सामंथा रुथ प्रभू बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज - सामंथा रुथ प्रभु बॉलिवुड पदार्पण

' ऊं अंटावा' या गाण्याने देशभरात खळबळ माजवणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आता बॉलिवूडकडे वळत आहे. जाणून घ्या कोणत्या अभिनेत्रीसोबत सामंथा मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू

By

Published : Jul 6, 2022, 1:44 PM IST

हैदराबाद: दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा-द राइज'मध्ये 'ऊं अंटावा' हे आयटम साँग करून खळबळ उडवून दिली. या गाण्याने समंथा खूप लोकप्रिय झाली असून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची वाट पाहत आहे. मीडियानुसार, चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे, कारण समंथा लवकरच बॉलिवूडमध्ये दाखल होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनोज बाजपेयी यांच्या 'फॅमिली मॅन-2' या वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना चकित करणारी सामंथा आता बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. असे सांगितले जात आहे की, सामंथा बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अहवालानुसार दिनेश विजन हा चित्रपट तयार करणार आहेत आणि असे म्हटले जात आहे की या चित्रपटाचे पेपर वर्क पूर्ण झाले आहे आणि अलीकडेच शूटिंगची वेळ आणि तारखा देखील निश्चित झाल्या आहेत. मात्र निर्माते अद्याप काहीही उघड करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

असे म्हटले जात आहे की सामंथा आणि आयुष्मान खुराना अभिनीत हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस फ्लोरवर जाईल आणि पुढील वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित होईल. रिपोर्ट्सनुसार, याशिवाय सामंथाने तिचा दुसरा बॉलिवूड प्रोजेक्ट देखील साइन केला आहे आणि त्याचे शूटिंग 2023 मध्ये सुरू होणार आहे.

समंथा रुथ प्रभू प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या लोकप्रिय टॉक शो कॉफी विथ करणमध्ये पहिल्यांदाच दिसणार आहे. या एपिसोडचा एक प्रोमो देखील समोर आला आहे, ज्यामध्ये समंथा आणि अक्षय कुमार शोमध्ये बसले आहेत.

हेही वाचा -Ranveer Singh B Irthday : करण जोहरने 'रॉकी'ला तर 'एक व्हिलेन'ने दिल्या दुसऱ्या व्हिलेनला शुभेच्छा !!

ABOUT THE AUTHOR

...view details