मुंबई - Samantha Ruth Prabhu Remove Tattoo : साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असते. सामंथानं सध्या अभिनयातून ब्रेक घेत आहे. आता अनेक दिवसापासून सामंथा आणि अभिनेता नागा चैतन्यच्या पॅच अपच्या चर्चा या जोरदार सुरू होत्या, मात्र आता या बातम्याना पूर्ण विराम मिळाला आहे. सामंथा आणि नागा चैतन्यचं नात 2021 मध्ये संपल. त्यानंतर दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. सध्या सामंथा-नागाची काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यामुळे हे दोघेही पुन्हा पॅच अप करत असल्याचं म्हटलं जात होत. मिळालेल्या माहितीनुसार नागा आणि सामंथा यांच्यात असं काही होणार नाही.
सामंथानं गुलाबी रंगाच्या साडीत फोटो शेअर केले :सामंथा रुथ प्रभूनं चैतन्यचं टोपणनाव 'चाय' हे तिच्या बरगड्यांवर गोंदवलं होतं. दोघेही एकत्र असताना हा टॅटू काढण्यात आला होता. सामंथानं आणखी दोन टॅटू काढले होते. हे टॅटू एप्रिलपर्यंत फोटोंमध्ये दिसत होते. जेव्हा सामंथा प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'च्या प्रीमियरसाठी लंडनला गेली होती, तेव्हा हे टॅटू फोटोंमध्ये दिसत नव्हते. म्हणजे पॅचअपच्या अफवा चुकीच्या आहे. सामंथानं गुलाबी रंगाच्या साडीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सामंथाच्या बरगड्यांवर टॅटू दिसत नाही.