महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

बॉलिवूड सेलिब्रिटींनी सामंथा रुथ प्रभूवर केला वाढदिवस शुभेच्छांचा वर्षाव - Samantha Ruth Prabhu birthday wishes

सोशल मीडियावर सामंथा रुथ प्रभूचे चाहते आणि जवळचे मित्र तिचे मनापासून अभिनंदन करत आहेत. फिल्म इंडस्ट्रीत सामंथा इतकी लोकप्रिय आहे की अनेक बॉलिवूड स्टार्सनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

सामंथा रुथ प्रभु जन्मदिन
सामंथा रुथ प्रभु जन्मदिन

By

Published : Apr 28, 2022, 4:42 PM IST

मुंबई - साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू 28 एप्रिलला तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते आणि जवळचे मित्र तिचे मनापासून अभिनंदन करत आहेत. इथे सामंथा इतकी लोकप्रिय आहे की अनेक बॉलिवूड स्टार्सनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' या चित्रपटातील 'ऊं अंतवा' या आयटम नंबरने सामंथाला जगभरात प्रसिद्धी मिळाली होती.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी सामंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सामंथा रुथ प्रभू वाढदिवस शुभेच्छा

वरुण धवन- बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने सामंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वरुणने इन्स्टा स्टोरी पोस्टमध्ये सामंताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कियारा आडवाणी - बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री कियारा अडवाणीने सामंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले, "प्रतिभावान आणि आश्चर्यकारक सामंथा रुथ प्रभू हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा, खूप प्रेम".

सामंथा रुथ प्रभू वाढदिवस शुभेच्छा

रश्मिका मंदाना- साउथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिनेही समंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सामंथाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रश्मिकाने लिहिले, 'सुंदर सामंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुझ्यासाठी प्रेम आणि फक्त प्रेम'.

सामंथा रुथ प्रभू वाढदिवस शुभेच्छा

कंगना रणौत - बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौतनेही सामंथा रुथ प्रभूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सामंथाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कंगनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा सामंथा रुथ प्रभू, तू सुंदर, प्रतिभावान आणि हॉट आहेस'.

सामंथा रुथ प्रभू वाढदिवस शुभेच्छा

समांथाने या सर्व पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केली आहे आणि सर्वांचे आभारही मानले आहेत.

हेही वाचा -'शिवराज अष्टक'मधील शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील चिन्मय मांडलेकरचे फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details