मुंबई- अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सध्या फिल्म शुटिंगमधून एक वर्षाचा ब्रेक घेतला आहे. ती वैद्यकिय उपचारासाठी अमेरिकेला जाणार असल्याचेही या आधी तिने स्पष्ट केले होते. सध्या ती विश्रांतीसाठी बालीमध्ये दाखल झाली आहे. या सहलीतील काही फोटो तिने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सामंथाने काही काळ भारतात प्रवास केल्यानंतर ती तिची मैत्रिण अनुषा स्वामीसोबत इंडोनेशियाला रवाना झाली होती.
सामंथाने इन्स्टाग्रामवर काही चाहत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करताच तिचे चाहते आणि सहकारी यांनी कमेंट सेक्शनमध्ये भरपूर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. तिच्याबद्दल कौतुक करणाऱ्या भरपूर प्रतिक्रिया पोस्टवर उमटल्या आहेत. सामंथाची मैत्रिण आणि बाली सहलीमध्ये असलेली तिची सहकारी अनुषा स्वामीने लाल ह्रदयासह कमेंट सेक्शनमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोत सामंथाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट्स परिधान केला आहे. तिने अलिकडेच ट्रिम केलेले केस डोक्यावरील हॅटने झाकले आहेत.
सामंथाने आपल्या शॉर्ट केसांचा एक व्हिडिओही शेअर केला होता. तिच्या या नव्या लूकवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली. कामातून विश्रांती घेतल्यानंतर सामंथा आपले स्रव लक्ष तब्येतीवर केंद्रीत करत आहे. तिला मायोसिटीस हा अॅटो इम्यून आजार झाला आहे. या आजाराशी सामना करताना तिने यशोदा नावाचा चित्रपट पूर्ण केला. त्यानंतर शाकुंतमल या तेलुगु भाषेतील पौराणिक चित्रपटात काम केले. आजारपणामुळे निर्मात्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तिने हातात असलेले सर्व चित्रपट पूर्ण केले आहेत.
सामंथाचा हेअर स्टायलिस्ट आणि चांगला मित्र रोहित भटकर याने तिच्या चित्रपटातून काहीकाळासाठी विश्रांती घेण्याच्या निर्णयाबद्दल एक भावनिक चिठ्ठी लिहिली होती. 'दोन वर्षात एक सेन्शेशनल म्यूझिक व्हिडिओ, तीन चित्रपट, सात ब्रंड कँपेन्स, दोन एडिटोरिएल्स आणि आयुष्यभराच्या आठवणी. उन्हाळ्याचे आणि पावसाळ्याचे दिवस, सुखाचे आणि दुःखाचे अश्रू या सर्वांचे आम्ही साक्षीदार आहोत. तुझ्यासोबतचा प्रवास संस्मरणीय झाला,' असे त्याने लिहिले होते. आजारातून लवकर बरे होण्यासाठी तिला रोहितने शुभेच्छाही दिल्या.