महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभू 'खुशी'च्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान झाली भावूक... - नागा चैतन्य

सामंथा रुथ प्रभू 'खुशी'च्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान भावूक झाली. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये नागा चैतन्य आणि तिच्यावर शूट केलेले गाणे सादर करण्यात आले होते. त्यानंतर सामंथा या गाण्यादरम्यान आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करताना दिसली...

Samantha Ruth Prabhu
सामंथा रुथ प्रभू

By

Published : Aug 17, 2023, 3:28 PM IST

मुंबई : सामंथा रुथ प्रभू सध्या आगामी 'खुशी' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग तिने पूर्ण केले आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान नुकतेच या चित्रपटासाठी एका म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये सामंथाही उपस्थित होती. या कार्यक्रमात नागा चैतन्यच्या 'मजिली' या चित्रपटातील 'प्रियतम..प्रियतम' चे लाईव्ह परफॉर्मन्सही सादर करण्यात आले. हे गाणे गायक सादर करत असताना सामंथा खूप भावूक होताना दिसली. सोशल मीडियावर सामंथाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात ती भावूक होताना दिसत आहे.

समांथाच्या डोळ्यात अश्रू : 'खुशी'च्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये सामंथा या व्हिडिओमध्ये आपले अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे गाणे सामंथाने घटस्फोटित पती नागा चैतन्यसोबत शूट केले आहे. या गाण्यात सामंथा आणि नागा चैतन्यची खूप सुंदर केमेस्ट्री दाखविण्यात आली आहे. हे गाणे खूप जास्त हिट देखील झाले होते. सामंथाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यूजर या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सामंथा या गाण्यामुळे भावूक झाल्याने तिचे चाहते खूप नाराज झाले आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'वेळ सर्व काही ठीक करेल'. त्यानंतर दुसऱ्या चाहत्यांनी म्हटले की, ती खूप चांगला अभिनय करते तिच्या अभिनयाला ऑस्कर देण्यात यावा, अशा देखील या व्हिडिओवर कमेंट आल्या आहेत.

खुशी चित्रपटाबद्दल... : खुशीबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे, हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि सामंथा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १ सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय खुशीचे प्रमोशन जोरात सुरू आहे. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्त चित्रपटाच्या निर्मात्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हेही वाचा :

  1. Jailer box office Collection Day 7 : 'जेलर' चित्रपटाने जगभरात ओलांडला ४०० कोटींचा टप्पा ...
  2. OMG 2 Box Office Collection day 6 : बॉक्स ऑफिसवर 'ओह माय गॉड २'ने सहाव्या दिवशी केली 'इतकी' कमाई....
  3. Gadar 2 box office collection day 6 : सनी देओल स्टारर 'गदर २' ची 'क्लब ३०० कोटी'च्या दिशेने वाटचाल

ABOUT THE AUTHOR

...view details