हैदराबाद - अल्लू अर्जुनचे पुष्पा: द रुलचे पोस्टर शुक्रवारी रिलीज झाल्यानंतर लगेचच इंटरनेटवर खळबळ उडाली. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला, मैत्री मूव्ही मेकर्सने अल्लु अर्जुनच्या चाहत्यांना चित्रपटाचा टीझर भेट दिला आणि पुष्पा 2 च्या धमाकेदार पोस्टरने आनंद द्विगुणित केला. केवळ चाहतेच नाही तर अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चे पोस्टरवर समंथा रुथ प्रभू, दिशा पटानी, राशी खन्ना आणि इतर सेलेब्रिटींनीही आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुष्पा २ च्या पोस्टरवरील अल्लु अर्जुन - पुष्पा 2 च्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन साडी नेसलेला आणि सोन्याचे दागिने घातलेला दिसत आहे. अल्लू अर्जुनला त्याच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना, समंथाने इंस्टाग्राम स्टोरीजवर त्याचे पुष्पा 2 पोस्टर शेअर केले. तिच्या S/O सत्यमूर्ती चित्रपटातील सहकलाकार अल्लु अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, समंथाने लिहिले, 'एक आणि एकमेव अल्लु अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा. काही लोक मला प्रेरणा देतात. तुम्ही जे करत आहात ते करत राहण्यासाठी तुम्हाला चांगले आरोग्य आणि प्रचंड उर्जा मिळो. देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहिल.'
पुष्पा २ च्या पोस्टवर प्रतिक्रिया - चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलेले पोस्टर व टिझर सुकुमारच्या नेतृत्वाखालील टीम पुष्पाने अल्लू अर्जुनमधील अभिनेत्यासाठी तसेच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर लगेचच, नेटिझन्सने अल्लू अर्जुनचे कौतुक करत प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू केला. मैत्री मूव्ही मेकर्सच्या इन्स्टाग्राम हँडलचा कमेंट विभाग पुष्पा: द राइजमधील संवादांनी भरलेला आहे. एका यूजरने लिहिले की, 'फूल नहीं आग है अल्लू अर्जुन,' तर दुसरा म्हणाला, 'झुकेगा नही' अल्लू अर्जुनच्या या लूकने केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही भारावून गेले आहेत. पुष्पा 2 च्या पोस्टरवर प्रतिक्रिया देताना, दिशा पटानीने अनेक फायर इमोजी टाकल्या तर राशि खन्ना म्हणाली, 'व्वाह्ह!!!.'
पुष्पा २ च्या रिलीजची तारीख - पुष्पाच्या सिक्वेलमध्ये रश्मिका मंदान्ना श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे तर फहद फासिल आयपीएस भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत परत येणार आहे. टीम पुष्पाने अद्याप बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही, तथापि, 2024 च्या उन्हाळ्यात सिक्वेल चित्रपटगृहात येण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे.
हेही वाचा -Congress on Sharad Pawar: शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार.. म्हणाले, 'राष्ट्रवादीचा दृष्टिकोन वेगळा, 19 विरोधी पक्षांसाठी गंभीर मुद्दा'