हैदराबाद - समंथा रुथ प्रभूचा आगामी चित्रपट शाकुंतलम यामधून अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अर्हा अभिनयात पदार्पण करणार आहे. शाकुंतलमच्या ट्रेलरमध्ये पीरियड ड्रामामधून अर्हाची झलक पाहायला मिळाली होती. स्टारकिडच्या पदार्पणाबद्दलची उत्सुकता वाढवत, समंथाने अलीकडेच अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी यांच्या 6 वर्षीय राजकुमारीसोबत काम करताना केलेली काही मनोरंजक निरीक्षणे शेअर केली.
समंथा शकुंतलमच्या प्रमोशनमध्ये गुंतलेली आहे आणि एका मुलाखतीदरम्यान, अभिनेत्री समंथाने अर्हाबद्दल सविस्तर सांगितले. मुलाखतीत, समंथा अर्हाबद्दल बोलणे थांबवू शकली नाही, तिच्या मते ही मुलगी एकदम हुशार आहे. अर्हाला भावी सुपरस्टार बनवणारी गोष्ट म्हणजे तिचा आत्मविश्वास आणि तिच्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवरही 200 क्रू मेंबर्सची गर्दी असते, असे समंथा म्हणाली.
समंथाच्या म्हणण्यानुसार, अर्हा ही जन्मजात सुपरस्टार आहे. तिने जर भविष्यात चित्रपटांमध्ये काम करायचे ठरवले तर तिला इंडस्ट्रीत ठसा उमटवण्यासाठी तिच्या वडिलांच्या नावाची गरज पडणार नाही. समंथा म्हणाली की शूटच्या दुसऱ्या दिवशी अर्हाने कोणतीही तक्रार न करता 12 तासांची शिफ्ट पूर्ण केली आणि तिच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले.