मुंबई- Sam Bahadur sonng release : 'सॅम बहादूर' या युद्धपटाची प्रतीक्षा विकी कौशलचे तमाम चाहते करताहेत. या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली असताना निर्मात्यांनी बढते चलो हे देशभक्तीपर गीत रिलीज केले आहे. गीतकार गुलजार यांच्या लेखनीतून उतरेलं हे गीत शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्यातील दृष्ये आणि ह्रदयाला भिडणारा सूर यामुळे देशभक्तीची भावना निर्माण होते. गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशल, नीरज काबी, एडवर्ड सोनेनब्लिक आणि झीशान अय्युब यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ट्रॅकची लिंक शेअर करत विकी कौशलनं इंस्टाग्रामवर लिहिले, "रुकना नही. झुकना नहीं. बढते चलो गाणे रिलीज झालंय." 'सॅम बहादूर' या चित्रपटात विकी भारताचा युद्ध नायक आणि पहिला फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि फातिमा सना शेख देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
विकीनं अलिकडेच चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले होते. याध्ये तो अतिशय कडक शिस्त असलेल्या सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होत. यामध्ये त्याच्या तोंडी अनेक दमदार संवाद पाहायला मिळाले होते. यातील सर्वात शेवटी संवाद होता, "आज के बाद कोई भी अफसर या जवान..मेरे रिटन ऑर्डर के बिना अपनी पोस्ट से पिछे नहीं हाटेगा..और मैं वो ऑर्डर कभी नहीं दूंगा."