मुंबई- बॉलिवूड स्टार सलमान खान याला हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात टॅलेंटेड कोण आहे असे विचारण्यात आले. तो म्हणाला की माझ्या काळामधील शाहरुख खान, अजय देवगण, अक्षय कुमार, आमिर खान हे खरंच टॅलेंटेड लोक आहेत. या पाचमधील एक निवडणे खूप कठीण आहे असे तो म्हणाला. 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 च्या पत्रकार परिषदेदरम्यान त्याला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता.
बॉलिवूड सेलेब्रिटीच्या मानधनाबद्दल सलमान खानचे भाष्य - सलमानने सांगितले की तो आणि त्याचे समकालीन सर्व प्रतिभावान, लक्ष केंद्रित करणारे आणि मेहनती आहेत आणि लवकर कधीही हार मानणार नाहीत. तरुण कलाकारांना आम्ही घेत असलेले मानधन दिसते. पण त्याचवेळी आमचे चित्रपटाही चालतात हे ते लक्षात घेत नाही. आमचे चित्रपट चालतात म्हणून आम्ही जास्त पैसे आकारतो, अशा आशयाचे भाष्यही यावेळी सलमानने केले. सलमान खान म्हणाला की हिंदी चित्रपट अयशस्वी होत असल्याचे बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. मात्र, चुकीचे चित्रपट बनवले जात आहेत, परिणामी ते बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहेत, असे त्यांनी कारण सांगितले. ते पुढे म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांना विश्वास आहे की ते सर्वोत्कृष्ट चित्रपट तयार करत आहेत, परंतु असे नाही.