मुंबई - Emraan Hashmi and salman khan :इमरान हाश्मीला सिरीयल किसर या नावानं ओळखलं जातं. सध्या तो 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'टायगर 3' मध्ये इमरान हाश्मीसोबत सलमान खान आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. इमराननं या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामधील त्याच्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. अॅक्शन चित्रपट 'टायगर 3'नं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय या चित्रपटानं जगभरातील 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला दिवाळीला प्रदर्शित झाला होता.
सलमान खान आणि इमरानचा किस :आज 18 नोव्हेंबर रोजी 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा पूर्ण करत आहे. दरम्यान आता देखील सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी या चित्रपटाचे जोरदारपणे प्रमोशन करत आहेत. या सक्सेस पार्टीत चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यात आला. यादरम्यान सलमान खान आणि इमरान हाश्मी यांच्यात असं काही घडलं, ज्यानं सर्वांनाच धक्का बसला. या प्रसंगी, सलमाननं इमरान हाश्मी किस घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सलमाननं म्हणाला, जर इमरानला 'टायगर 3' मध्ये खलनायकाच्या भूमिकेत कास्ट केले नसते तर, तो त्याला नक्की किस करताना या चित्रपटामध्ये दिसला असता.