मुंबई - Salman khan : सलमान खान हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. दबंग खान हा लाखो लोकांच्या मनावर राज्य करतो. 'वॉन्टेड', तेरे नाम 'भारत', 'सुलतान', 'एक था टायगर', 'प्रेम रतन धन पायो', यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहेत. सलमाननं त्याची बहीण अलविरा खान अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीसाठी इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सुंदर कॅप्शन देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. सलमान खाननं इंस्टाग्राम हँडलवर अलीजेह अग्निहोत्रीसोबतचा एक थ्रोबॅक फोटो चाहत्यासोबत शेअर केला आहे.
सलमान खाननं इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट :या फोटोत दोघेही खूप क्यूट दिसत आहेत. या फोटोमध्ये सलमान खाननं आपल्या भाचीला कडेवर घेतले असून दोघेही निरागसपणे एकमेकांकडे पाहत आहेत. फोटो शेअर करताना सलमाननं लिहलं, 'मामूवर एक उपकार कर. तुम्ही जे काही करशील ते मनापासून आणि मेहनतीन कर! नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात सरळ जा आणि उजवीकडे वळा. फक्त स्वतःशीच स्पर्धा करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एकदा तुम्ही वचनबद्धता केली की, काकांचेही ऐकू नका. सलमाननं आपल्या भाचीला तिच्या आयुष्यात कठोर परिश्रम करण्याची आणि नेहमी स्वतःशी स्पर्धा करण्याची विनंती केली आहे. सलमानची ही पोस्ट शेअर होताच, त्याचे मित्र आणि चाहते कमेंट विभागात प्रतिक्रिया देत आहेत.